‘अंगणवाडी ताईं’चा जेलभरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:01 IST2017-10-05T15:58:02+5:302017-10-05T16:01:33+5:30

मानधनवाढ, पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.

आज सकाळपासून विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बळ वाढले असल्याचा दावा समितीने केला आहे.

यवतमाळमध्ये महिलांनी भरपावसात आंदोलन करत सरकारचा निषेध केला.