शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सतीश भोसले पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? खोक्याने मोठी तयारी केली होती, समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:58 IST

1 / 8
Satish Bhosale : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण जाते असतानाच आता आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
2 / 8
या व्हिडीओमध्ये भोसले हा मारहाण करत असल्याचे दिसत आहे. गेल्या सहा दिवसापासून भोसले फरार होता. आज पोलिसांनी प्रयागराजमधूल अटक केली. दरम्यान, सहा दिवसापासून गुंगारा देणारा भोसले प्रयाहराजमध्ये पोहोचला.
3 / 8
गेल्या सहा दिवसांपासून बीड पोलीस सतीश भोसले याच्या मागावर होते, पण तो गुंगारा देत होता. पण, पोलिसांनी खोक्या वापरत असलेला मोबाईल नंबर ट्रेस केला.
4 / 8
सतीश भोसले हा प्रयागराजमधून विमानाने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. वेळीच बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने सतीश भोसले याला प्रयागराज विमानतळावरुन अटक केली.
5 / 8
सतीश भोसले याने कालच वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. यावरुन विधिमंडळात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले होते.
6 / 8
वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. हाच फरार खोक्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देत होता या सर्व प्रकारामुळे पोलिस करतात काय?
7 / 8
सतीश भोसले याचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीडच्यागुन्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली. सतीश भोसले या तरुणाने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले. सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
8 / 8
काही दिवासापासून बीड पोलिसांची पथक सतीश भोसले याच्या मागावर होते. काल भोसले याने काही वृत्तवाहिनींना प्रतिक्रिया दिली होती. यावरुन विधिमंडळात सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना का सापडत नाही?, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSuresh Dhasसुरेश धसUttar Pradeshउत्तर प्रदेशKumbh Melaकुंभ मेळा