शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'लॉकडाऊनमध्ये अक्षयला तारांकित रिसॉर्ट मिळालंच कसं?'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 2:24 PM

1 / 12
अभिनेता अक्षय कुमारचानाशिक त्र्यंबकेश्वर दौरा वादात सापडला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या हवाई दौऱ्याच्या चौकशीच आदेश दिले आहेत.
2 / 12
अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, त्यास परवानगी कोणी दिली. विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत.
3 / 12
तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.
4 / 12
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव या भागात अक्षय कुमारचा दौरा होता, येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षयकुमारच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग होतं.
5 / 12
विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचं स्वागतही केलं जातं
6 / 12
तसेच, अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना अक्षयकुमारच्या सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला. मग, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे
7 / 12
याप्रकरणी जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करावा, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे
8 / 12
विशेष म्हणजे, सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वच हॉटेल्स अन् रिसॉर्ट बंद असतानाही, अक्षयसाठी तारांकीत रिसॉर्टचे दरवाजे कसे उघडण्यात आले,
9 / 12
येथे अक्षयकुमारचा पाहुणचार कसा झाला? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अक्षयकुमारच्या संपूर्ण दौऱ्याच्या चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.
10 / 12
अक्षयकुमारच्या वैयक्तिक दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असून जिल्हाधिकारी यांनी माध्यमातूनच यांसदर्भात माहिती समजली.
11 / 12
याबाबत मला कुठलिही पूर्वकल्पना किंवा माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली नाही, याबाबत पोलिसांकडून माहिती मिळणे अपेक्षित होते, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हटले आहे.
12 / 12
त्यामुळे अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारChhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या