CoronaVirus News: उद्यापासून नागरिकांना मिळणार अनेक सवलती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:56 PM2020-06-02T17:56:21+5:302020-06-02T18:02:58+5:30

एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'मिशन बिगिन अगेन'ची घोषणा केली. या अंतर्गत जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीनं विविध सवलती दिल्या जाणार आहेत.

घराबाहेरील व्यायामासाठी परवानगी असेल. समुद्र किनारे, खाजगी/सार्वजनिक मैदाने, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग/धावणे/जॉगिंगला काही अटींवर परवानगी असेल.

मैदानावरील व्यायामासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट असेल. सामूहिक हालचालींना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र मोकळ्या मैदानात गर्दी करता येणार नाही.

प्लंबर, ईलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल, आणि इतर तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना कामं करता येतील. त्यासाठी मास्क वापरणं, शारीरिक अंतर राखणं बंधनकारक असेल.

गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये वाहनांच्या दुरूस्तीची कामं करता येतील. मात्र तिथे होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.

सर्व शासकीय कार्यालयांत १५ टक्के कर्मचारी अथवा १५ कर्मचारी (जी संख्या जास्त असेल त्यानुसार) काम करतील.

मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकानं सकाळी ९ ते ५ वेळेत सम-विषमनुसार उघडी राहतील.

कपड्यांच्या दुकांनामधील ट्रायल रूम बंद राहतील. तसेच एक्सचेंज आणि माल परत करण्याचे धोरण अथवा सुविधा बंद असेल.

केवळ खरेदीसाठी चारचाकी वाहने घराबाहेर काढण्याला बंदी असेल.

विनाकारण लांब पल्ल्याचा प्रवास करण्यावर बंदी असेल.