शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार?; नियमांबाबतची महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:24 IST

1 / 7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आणि या आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळून केवळ ४६ जागा जिंकता आल्या.
2 / 7
विधानसभेच्या एकूण २८८ जागा असलेल्या महाराष्ट्रात विरोधकांमधील एकाही पक्षाला २९ जागा मिळू न शकल्याने विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
3 / 7
दिल्लीत केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिले होते. तसेच, महाराष्ट्रातही होईल का? राज्यात विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का याची चर्चा सुरू झाली आहे.
4 / 7
महाराष्ट्र विरोधी पक्षनेत्याबाबत नियम काय आहेत, अशी विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली असून, योग्य तो निर्णय घेऊ असे विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते.
5 / 7
महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते, त्यासाठीचा कायदा कोणता, अशी विचारणा करणारे पत्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना १० दिवसांपूर्वी देण्यात आले होते. या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तत्काळ अवगत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
6 / 7
ही माहिती अद्याप मिळाली नसल्याने रविवारी उद्धवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली.
7 / 7
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी जागांची कोणतीही अट विधिमंडळात नाही. त्यामुळे राज्याला लवकरच विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे