शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुला-मुलींचे 'या' गोष्टींमध्ये विचार असतात एकसारखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 5:14 PM

1 / 7
1. मित्रांसोबत मज्जा-मस्ती करणं : मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करणं, वेळ घालवणं, मज्जा-मस्ती करणं आवडते. निरनिराळ्या पद्धतीनं आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करणं त्यांना पसंत असते.
2 / 7
2. दादा-ताई बोललं नापसंत : जिथे मुलांना काका, दादा म्हणून हाक मारलेली आवडत नाही, तसंच मुलींनाही काकी, ताई अशी हाक मारलेली अजिबात चालत नाही.
3 / 7
3. हवं असतं खरं प्रेम : प्रेमाकडे पाहण्याची सर्वांची दृष्टी वेगळी असली तरी मुलं-मुली खऱ्या प्रेमाच्याच शोधात असतात. या प्रकरणात दोघाचांही विचार अगदी सारखाच असतो.
4 / 7
4. भावूक स्वभाव : मुलं भलेही आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मुलींप्रमाणे काही मुलंदेखील भावूक असतात. आपल्या भावना कोणाही व्यक्तीसमोर व्यक्त करणं मुलांना आवडत नाही.
5 / 7
5. करिअरसंबंधी खूप स्वप्न असतात : ज्याप्रमाणे मुलं आपल्या करिअरला प्राधान्य देतात, त्याचप्रमाणे मुलींनाही करिअरमध्ये यशाची शिखर सर करण्याची अनेक स्वप्न असतात. करिअरसंबंधी दोघांचीही भरपूर स्वप्न असतात आणि ही स्वप्न त्यांना सत्यातही उतरवायची असतात.
6 / 7
6.मुलंही करतात गॉसिप : मुलंही प्रचंड प्रमाणात गॉसिप करतात. मुलांना गॉसिप करायला खूप आवडतं. पण मुलं ही गोष्ट मान्य करत नाहीत.
7 / 7
7. चूक मान्य नसणे - काही मुलामुलींना स्वतःच्या चुका मान्य नसतात. ही सवय दोघांमध्ये असते.