Jyotiba Chaitra Yatra 2018 लाखो भाविकांच्या साक्षीने ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:56 IST2018-03-31T19:56:48+5:302018-03-31T19:56:48+5:30

‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र याात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर अत्यंत उत्साहात व तितक्याच श्रध्देने पार पडली. यानिमित्त श्रींची सरदारीरूपात सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, गुलालाने न्हावून गेलेला डोंगर आणि गगनचुंबी सासनकाठ्या अशा भक्तीमय वातावरणात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने शनिवारी वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. उन्हाचा तडाखा असूनही भाविक तहानभूक हरपून या उत्सवात सहभागी झाले. (आदित्य वेल्हाळ)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मानाच्या निनाम पाडळीच्या सासनकाटीचे पूजन झाले. यावेळी आमदार सतेज पाटील, सत्यजित पाटील (सरुडकर), राजेश क्षीरसागर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
निनाम पाडळीच्या मुख्य सासनकाठीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
मानाचा सूरज घोडा मिरवणुकीत जाताना. (छाया : आदित्य वेल्हाळ)
जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे निघालेली सासनकाठ्यांची मिरवणूक. (छाया : आदित्य वेल्हाळ)
मानाचा सूरज घोडा मिरवणुकीत जाताना. (छाया : आदित्य वेल्हाळ)
जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे गुलालाची उधळण करताना भाविक. (छाया : आदित्य वेल्हाळ)
सासनकाठी पूजनवेळी झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी थांबलेले पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह पोलिसांचा ताफा. (छाया : आदित्य वेल्हाळ)
सासनकाठीभोवती जल्लोष करताना भाविक. (छाया : आदित्य वेल्हाळ)
एकमेकांत अडकलेल्या सासनकाठ्या सोडविताना मानकरी.(छाया : आदित्य वेल्हाळ)
‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. उन्हाचा तडाखा असूनही भाविक तहानभूक हरपून या यात्रोत्सवात सहभागी झाले. पिपाणी वाजविताना भाविक. (छाया : आदित्य वेल्हाळ)
जोतिबा यात्रेसाठी राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांनी शुक्रवार (दि. ३०) पासून आपली चारचाकी वाहने वाडी रत्नागिरी येथील चव्हाण तळ्याच्या सभोवताली चहूबाजूंनी पार्किंग केली होती. त्यामुळे वाहनांनी चारीबाजूंनी घेरलेला हा परिसर शनिवारी असा दिसत होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)
जोतिबा यात्रेसाठी राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांनी आपली वाहने सासनकाठ्यांसह पाण्याच्या टाकीच्या परिसरात लावली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
जोतिबा यात्रेसाठी आलेल्या भाविकांना व्हाईट आर्मी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
जोतिबा यात्रेत आलेल्या भाविकांकरिता सहजसेवा ट्रस्टच्या वतीने गायमुख येथे मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली होती. याचा लाभ शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला. (सर्व छाया - आदित्य वेल्हाळ)