YouTube वर 'छोटू दादा' रॉक; एक दिवसाची कमाई ऐकून बसेल मोठा शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 13:42 IST2020-01-10T13:08:58+5:302020-01-10T13:42:32+5:30

सोशल मीडियामुळे अनेक जण लोकप्रिय झाले आहेत. यूट्यूबवर सध्या छोटू दादाच्याच नावाची चर्चा आहे. यूट्यूब सुपरस्टार छोटू दादाने दिग्गज कलाकारांना मागे टाकत बक्कळ कमाई केली आहे.
मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर छोटू दादाने यूट्यूबवर प्रसिद्धी मिळवली आहे. यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.
छोटू दादाचं खरं नाव शफिक छोटू असं आहे. त्याची कला लोकांना खळखळून हसवते.
छोटू दादा खान्देशी मूव्ही या यूट्यूब चॅनेलवर काम करण्यासाठी एका दिवसाला तब्बल 1 लाख 25 हजार रुपये घेतो.
जवळपास 200 खान्देशी मूव्हीमध्ये छोटू दादाने काम केलं आहे.
यूट्यूबवरच्या त्याच्या व्हिडीओला तुफान लाईक्स असतात.
अनेक संकटांचा सामना करत छोटू दादाने करिअरमध्ये यश संपादन केलं आहे.
सुरुवातीला कामासाठी त्याला थोडा स्ट्रगल करावा लागला. मात्र काही काळानंतर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळायला सुरुवात झाली.