जगातील सर्वात मोठ्या चीनच्या भिंतीचं रहस्य ऐकून तुम्हीही चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 09:10 IST2019-09-06T09:08:57+5:302019-09-06T09:10:59+5:30

चीनच्या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी एक तटबंदी भिंत असून दगड, विटा, चिखल, लाकूड यांचा वापर करून ही भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत चीनच्या पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरली आहे.
चीनच्या भिंतीची उंची सुमारे 30 फूट आहे तर काही ठिकाणी ही भिंत मोठ्या शिखराप्रमाणे दिसते.
मंगोल लोकांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी या भिंतीची उभारणी करण्यात आली होती. चीनच्या या भिंतीचे बांधकाम 5 व्या शतकात सुरू झाले अन् 16 व्या शतकात बांधकाम पूर्ण झाले.
१९३० साली चीन सरकारने या भिंती वरून महामार्ग बनवण्याची योजना आखलेली होती. ज्यामुळे देशाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत सरकारी मदत पोचवणे सोपे जाईल. अन्न आणि लष्करी मदत पोचवण्यासाठी याचा वापर केला जाईल असा यामागे हेतू होता. परंतु, या भिंतीवरील हा महामार्ग अस्तित्वात आलाच नाही.
ही भिंत बांधताना चिकट तांदळाचा वापर करण्यात आला आहे. या भिंतीचे बांधकाम मजबूत व्हावे म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे.