शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आपल्याला इतकी थंडी का वाजते? जाणून घ्या याचे शास्त्रीय कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 5:48 PM

1 / 9
सध्या थंडीने जोर पकडला आहे. थंडीच्या मोसमात हात-पाय सुन्न पडतात. काहींना कमी तर काहींना जास्त थंडी का वाटते? पण, आपल्याला इतकी थंडी का वाजते, याचा विचार आपण कधी केला आहे का? यामागचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया...
2 / 9
प्रत्येक व्यक्तीला अन्न, जीवनशैली आणि शरीराच्या अंतर्गत क्षमतेनुसार थंडी जाणवते. पण थंडीची सुरुवात कुठे होते? तापमान कमी झाल्यावर शरीराचे पहिले संरक्षणात्मक वर्तुळ, म्हणजेच त्वचेला थंडी जाणवते. त्वचेखाली असलेल्या थर्मो-रिसेप्टर मेंदूला थंडी वाजत असल्याचा संदेश पाठवतात. ही भावना वेगवेगळ्या मानवी शरीरात वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि तीव्रतेने उद्भवते.
3 / 9
त्वचेला थंडी लागताच संपूर्ण शरीराव शहारे उभे होतात. शरीर थरथरू लागते, यामागचे कारण म्हणजे, त्वचेतून निघणाऱ्या लहरी मेंदूतील हायपोथालेमस (Hypothalamus) मध्ये जातात. हायपोथालेमस शरीराचे तापमान आणि वातावरणातील फरक, यात संतुलन साधत असतो. हे संतुलन साधताना आपले शहारे उभे राहतात किंवा थरथराट होते.
4 / 9
हायपोथालेमस शरीराच्या नर्वस सिस्टीमला शरीराचे तापमान कमी होत असल्याचा संदेश देतो. ही सूचना फार महत्वाची असते, कारण आपले शरीर कमी तापमान झालेले सहन करू शकत नाही. तापमान खूप कमी झाले, तर काही अवयव काम करणे बंद करू शकतात. जास्त थंडीलाच हायपोथर्मियादेखील म्हणतात. या अवस्थेत मृत्यूही होऊ शकतो.
5 / 9
या हायपोथालेमसमुळेच शरीराचे आतील तापमान गरम राहते. त्वचेला थंडी वाजत असली तरी आपल्या शरीराचे आतील तापमान नियंत्रणात राहते. काहीवेळा थंडी वाढल्यानंतर आपले काही अवयवांचा(हात-पाय) काम करण्याचा वेग मंदावतो.
6 / 9
वेग मंदावल्यामुळे ज्यास्त मेटाबॉलिक हीट (Metabolic Heat) तयार होते आणि थंडी वाजत असलेल्या भागांना आतून गरम करण्याचा प्रयत्न करते. यामुळेच काही अवयव अचानक थरथरू लागतात. थरथराट येते म्हणजेच, तुमचे शरीर आतील भागास गरम करण्याचा प्रयत्न करत आहे.
7 / 9
तुम्ही जेव्हा थरथरता तेव्हा तुमच्या रक्त वाहिण्या आकुंचन पावतात आणि रक्ताला एका जागेवर थांबवतात. या रक्ताला थंड अवयवाकडे जाण्यापासून रोखतात. यामुळे तुमच्या रक्तावर परिणाम होत नाही आणि तुम्ही आतुन सुरक्षित राहता. अशा स्थितीत तुम्हाला बाहेरुन थंडी वाजत असली तरी आतील भाग गरम राहतो.
8 / 9
अनेक शोधांमध्ये सांगण्यात आलंय की, लिंग, वय आणि जीन्सवर थंडीची तीव्रता अवलंबून असते. ज्याप्रकारे आपल्या शरीराची ठेवण वेगवेगळी असते, त्याच प्रमाणे शरीरातील तापमापी सेंसरची संख्याही कमी जास्त असू शकतो.
9 / 9
असाही एक दावा करण्यात येतो की, लहान मुले किंवा तरुणांपेक्षा वृद्धांना थंडी कमी वाजते. याचे कारण म्हणजे, वयानुसार माणसाचे काही अवयव काम करणे बंद करत असतात. अशा परिस्थितीत वृद्धांना थंडीची जाणीवच होत नाही, म्हणूनच त्यांना तरुणांपेक्षा कमी थंडी वाजते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय