पृथ्वी जर आधी आगीचा गोळा होती, कोरडी होती, मग इथे पाणी आलं कुठून? समुद्र कसे बनले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:32 IST
1 / 8How Ocean Formed In Earth: समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. समुद्र किनारी बसून लाटांचा आनंद घ्यावा, समुद्राच्या लाटांसोबत खेळावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. म्हणूनच तर जगभरातील समुद्र किनाऱ्यांवर लोकांची गर्दी बघायला मिळते. पण आपला मुद्दा जरा वेगळा आहे. आपल्याला माहीत असेल की, पृथ्वी सुरूवातीला खूप गरम होती, म्हणजे आगीचा गोळाच म्हणा. मग इथे पाणी आलं कुठून आणि समुद्र कसे तयार झाले? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबाबत वेगवेगळी मतं आहेत.2 / 8तर यावर अनेक संशोधकांचं असं मत आहे की, पृथ्वीच्या निर्माणादरम्यान यात पाणी होतं. पृथ्वीमध्ये अनेक केमिकल तत्व होते. त्यातीच काही म्हणजे ऑक्सीजन आणि हायड्रोजन आहेत. हे दोन्ही तत्व पाणी बनण्यासाठी गरजेचे होते. पृथ्वी थंड झाल्यावर हे तत्व मिक्स झाले आणि पाणी तयार करू लागले.3 / 8एका अंदाजानुसार, पृथ्वीच्या आतील ज्वालामुखी उद्रेक आणि अनेक भूगर्भीय हालचालींमुळे पाणी वाफ बनून वर आलं आणि आकाशातून पावसाच्या रूपात जमिनीवर उतरलं. ज्यामुळे समुद्र बनले.4 / 8तर काही वैज्ञानिकांचं मत आहे की, पृथ्वीवर पाणी अंतराळातून आलं. पृथ्वीच्या निर्माणादरम्यान सोलर सिस्टीममध्ये अनेक धुमकेतू, क्षुद्रग्रह आणि उल्कापिंड होते. यातील काहींमध्ये पाणी होतं, पण ते बर्फाच्या रूपात होतं. वैज्ञानिकांनुसार यांची पृथ्वीशी टक्कर झाली आणि पाणी इथे आलं.5 / 8असंही मानलं जातं की, पाणी भलेही पृथ्वीच्या आतून किंवा अंतराळातून आलं असेल, पण ते गोठवण्याची प्रक्रिया खूप मोठी होती. पृथ्वी थंड झाल्यावर तापमान खूप कमी झालं, ज्यामुळे पाणी गोठू लागलं.6 / 8एक असाही अंदाज आहे की, सुरूवातीला उल्कापिंडांच्या धडकांमुळे पृथ्वीवर अनेक मोठाले खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये पाणी हळूहळू भरू लागलं, नंतर या पाण्यानं समुद्राचं रूप घेतलं.7 / 8पाण्याबाबत वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, आजपासून साधारण ३.८ ते ४ अब्ज वर्षाआधी पृथ्वीवर समुद्र बनण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल. जसजसं पृथ्वीचं तापमान कमी झालं, समुद्रांचा आकारही वाढला. 8 / 8वैज्ञानिकांनुसार, हिंद महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर यांसारखे समुद्र लाखो वर्षांच्या भूगर्भीय हालचालींचं परिमाण आहेत.