जेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:51 IST2018-08-14T16:47:51+5:302018-08-14T16:51:34+5:30

दक्षिण आफ्रिकेतील बोत्वाना येथील मशातू अभयारण्यात सिंहीणीचे कुटुंब चक्क 'फोटोग्राफर'च्या भूमिकेत दिसले. या अभयारण्यात भटकंतीसाठी गेलेल्या हौशी वन्यप्रेमीचा कॅमेरा चुकून सिंहीणीच्या तावडीत सापडला आणि पुढे जे घडले ते आश्चर्यकारक होते.
सिंहणीने तो कॅमेरा आपल्या छाव्यांकडे सुपूर्द केला आणि त्यांनीही कॅमेरासोबत खेळण्याची हौस पूर्ण केली.
सिंहणीने तो कॅमेरा आपल्या छाव्यांकडे सुपूर्द केला आणि त्यांनीही कॅमेरासोबत खेळण्याची हौस पूर्ण केली.
फोटोग्राफर बनण्याची हौस पूर्ण केल्यावर त्या सिंहीणीने कॅमेरावरील ताबा सोडला. पण, तो कॅमेरा यापुढे ख-याखु-या फोटोग्राफरला वापरण्यायोग्य राहिलेला नाही.