1 / 7लवकरच पावसाळा सुरू होत असून पावसाचे पाणी साठविण्यासाठी एका व्यक्तीने चांगलीच शक्कल लढवली आहे. त्यासाठी प्लास्टीकच्या टिपाडांना छिद्र पाडून ते जमिनीत पुरवण्यात येणार आहे.2 / 7छिद्र पाडलेले हे टिपाड घरासमोरच एक खड्डा करुन त्या खड्ड्यात पुरण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरेल.3 / 7खड्ड्यात पुरलेल्या या टिपाडात पावसाचे पाणी पाईपलाईनद्वारे सोडण्यात येणार आहे. घरावरील पत्र्यांवर किंवा परीसरातील पाणी पन्हाळीतून थेट या टिपात पडणार आहे. 4 / 7जमिनीत एका विशिष्ट आकाराचा खड्डा पाडून त्यामध्ये हे टीप बसविण्यात आले आहे. तर, यास असलेल्या छिद्रांमुळे हे पाणी जमिनीत मुरेल आणि उन्हाळ्यात या पाण्याचा बोरद्वारे उपसा केला जाईल.5 / 7घरासमोर अशाप्रकारे अनेक टीप खड्ड्यात बसविण्यात आले असून त्याद्वारे जमिनीत पाणी जिरविण्याचे काम केले जात आहे. 6 / 7सोशल मीडियावर या पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेचं कौतुक होत असून प्रत्येकानं आपल्या परीने असा प्रयोग केल्यास पावसाच्या पाण्याची चांगली साठवणूक होऊ शकते. 7 / 7पाणी जिरविण्यासाठी खांदलेल्या खड्याला पूर्णपणे व्यवस्थित बंद केले आहे, केवळ पाईपाद्वारे त्यामध्ये पाणी जाईल अशी व्यवस्था असल्याने, कुठलाही धोका नाही. तसेच, या पाण्याच्या साठवणीमुळे घरासमोरील बोरच्या पाण्याची पातळी वाढेल हे नक्की.