शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zanetti Train: न उलगडलेले रहस्य! इटलीची ट्रेन बोगद्यात घुसताना अचानक गायब झाली, आजवर नाही सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 1:47 PM

1 / 10
ट्रेन आणि प्लॅटफॉर्मबाबत आजवर अनेक रहस्यमयी किस्से ऐकले असाल. मात्र, यावर एक मोठी घटना म्हमजे इटलीची zanetti train. ही ट्रेन 106 प्रवाशांना घेऊन जात होती. ती एका बोगद्यात शिरत असताना अचानक गाय झाली. जी आजवर कुणालाही सापडली नाही. (Zanetti-The Ghost Train Story)
2 / 10
ही घटना 1911 मधील आहे. या ट्रेनमध्ये 106 लोक प्रवास करत होते. ही ट्रेन कुठे आहे, कुठे गेली हे एक रहस्यच बनून राहिले आहे. (in summer 1911 the train 'Zanetti' with three cars and 106 passengers left Rome and should have gone through the mountain tunnel in Lombard. )
3 / 10
जेनेटी नावाची ही ट्रेन 1911 मध्ये रोमन स्टेशनवरून निघाली. या प्रवासात ट्रेनला एका बोगद्यातून पुढे जायचे होते. ही ट्रेन जशी त्या बोगद्यात घुसली, ती अचानक गायब झाली. या ट्रेनचा खूप शोध घेतला गेला. मात्र, काहीच समजले नाही.
4 / 10
काही दिवसांनी या ट्रेनमधील दोन प्रवासी बोगद्याच्या बाहेर जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी जे सांगितले ते ऐकून सगळेच धक्क्यात गेले.
5 / 10
य़ा दोघांनी सांगितले की, जशी ही ट्रेन बोगद्याच्या जवळ आली, तेथून एक रहस्यमयी धूर निघत होता. तो पाहून आम्ही घाबरलो आणि ट्रेनच्या बाहेर उडी मारली. यानंतर ट्रेन बोगद्यात गेली पण परत कधीच बाहेर आली नाही.
6 / 10
या रहस्यमयी घटनेबाबत सांगितले जाते की, ही ट्रेन तेव्हाच्या वेळेपेक्षा 71 वर्षे मागे भूतकाळात गेली. काही मीडिया रिपोर्टनुसास ही ट्रेन 1840 मध्ये मेक्सिकोमध्ये पोहोचली. यामुळे या ट्रेनला भूताची ट्रेन म्हटले जाते.
7 / 10
मेक्सिकोच्या एका महिला डॉक्टरने दावा केला होता, ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तिथे रहस्यमयी पद्धतीने 104 लोकांना भरती करण्यात आले होते. ते सारे वेडे झाले होते. मात्र, ते एका ट्रेनमधून इथे आल्याचे सांगत होते.
8 / 10
हैरान करणारी गोष्ट म्हणजे, त्यावेळी कोणतीही अशी ट्रेन बनली नव्हती जी रोमहून थेट मेक्सिकोला जाऊ शकेल. तसेच या लोकांचे मेक्सिकोला येण्याचे कोणतेही रेकॉर्डही नव्हते.
9 / 10
ही अजब घटना आजही जगासाठी रहस्य बनलेली आहे. यापेक्षा मोठे रहस्य म्हणजे या ट्रेनला इटली, रशिया, जर्मनी आणि रोमानियामध्ये पाहण्यात आल्याचे दावे करण्यात आले आहेत.
10 / 10
ही अजब घटना आजही जगासाठी रहस्य बनलेली आहे. यापेक्षा मोठे रहस्य म्हणजे या ट्रेनला इटली, रशिया, जर्मनी आणि रोमानियामध्ये पाहण्यात आल्याचे दावे करण्यात आले आहेत.