शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 2:18 PM

1 / 6
सामान्यपणे कोणत्याही नाइट क्लबमध्ये हिंदी, पंजाबी किंवा इंग्रजी गाण्यांवर लोक ठेका धरतात. पण तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका नाइट क्लबमध्ये चक्क संस्कृत गाण्यांवर लोक थिरकायला लागतात तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना! पण हे खरं आहे.
2 / 6
भारतापासून दूर एक असा देश आहे जिथे एक अनोखा नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये संस्कृत गीतांवर लोक नाचू लागतात. इतकेच नाही तर तल्लीन होतात.
3 / 6
या देशाचं नाव आहे अर्जेंटिना. येथील राजधानी ब्यूनस-आयर्समध्ये ग्रोव नावाचा एक नाइट क्लब आहे. यात गणेश शरणम, गोविंदा-गोविंदा, जय-जय राधा रमन हरी बोल आणि जय कृष्णा हरे सारखी गाणी वाजवली जातात.
4 / 6
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ब्यूनस-आयर्समधील हा नाइट क्लब लहान नाइट क्लब नाही. हा एक मोठा नाइट क्लब असून इथे एकत्र ८०० लोक तुम्हाला नाचताना दिसतील. (Image Credit : Social Media)
5 / 6
भारतातील एक अॅम्बेसेडर विश्वनाथन २०१२ मध्ये अर्जेंटिनाला गेले होते आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले होते. त्यांनी सांगितले की, त्या नाइट क्लबमध्ये ना दारू मिळत ना कुणी धुम्रपान करताना दिसत. (Image Credit : भारतातील एक अॅम्बेसेडर विश्वनाथन २०१२ मध्ये अर्जेंटिनाला गेले होते आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले होते. त्यांनी सांगितले की, त्या नाइट क्लबमध्ये ना दारू मिळत ना कुणी धुम्रपान करताना दिसत. (Image Credit : Social Media)
6 / 6
इतकेच नाही तर या नाइट क्लबमध्ये ड्रग्सवर बंदी आहे आणि मांसही खाल्लं जात नाही. इथे केवळ सॉफ्ट ड्रिंक्स फळांचा ज्यूस आणि शाकाहारी जेवण मिळतं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके