शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती

By manali.bagul | Published: February 28, 2021 12:59 PM

1 / 6
राजस्थानच्या जयपूरमध्ये एक आगळी वेगळी चोरीची घटना समोर आली आहे. अशी घटना तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. या घटनेतील तक्रारदार वैशाली नगर परिसरातील आहे. हे प्रसिद्ध हेअर ट्रांसप्लांट डॉक्टर सुनीत सोनी यांचे घर आहे. डॉक्टर सोनी यांनी आपल्या घराच्या खाली एक चांदीनं भरलेला बॉक्स ठेवला होता. पण हैराण करणारी गोष्ट अशी की ही गोष्ट चोरांना कळली तरी कशी?.
2 / 6
सगळ्यात आधी चोरांनी डॉक्टरच्या घराशेजारी ९० लाख रूपयांचं घर विकत घेतलं. त्यानंतर या घराचं काम करायला सुरूवात केली. ३ महिन्यात १५ फूट खोल आणि २० फूट लांब भूयार तयार केलं. जेणेकरून चोरांना डॉक्टरच्या घराच्या बेसमेंटपर्यंत पोहोचता येईल आणि संपूर्ण खजिना लुटता येईल. असा प्लॅन तयार केला असावा.
3 / 6
डॉक्टर सोनी यांनी ३ महिन्यांआधी चांदीचा एक खोका घराच्या तळाला ठेवला होता. काही दिवसांपूर्वी हा खोका पाहायला ते खाली गेले तेव्हा त्यांची झोपच उडाली. चोरांनी बॅक्स कटरचा वापर करून या खोक्याचे दोन भाग केले होते आणि खाली खोके त्याच ठिकाणी ठेवले होते.
4 / 6
त्यानंतर चोरीची सुचना पोलिसांना देण्यात आली. दरम्यान चांदीच्या खोक्यात बराच खजिना होता. याबाबत कोणतीही माहिती डॉक्टर सोनी यांनी पोलिसांना दिलेली नाही. पोलिसांनीही स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही.
5 / 6
एसीपी राय सिंह बेनिवाल यांनी सांगितले की, ''यात एक किंवा दोन लोकांचा समावेश असू शकतो. डॉक्टरांच्या जवळचे लोक या प्रकरणात आरोपी असू शकतात. कारण त्यांनाच चांगलं माहित असावं की, बेसमेंटला चांदीचा खोका ठेवला आहे. ''
6 / 6
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना काहीजणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण केला जाणार आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटकेRobberyचोरी