शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात आधुनिक विमानतळ; अवघ्या तीन वर्षात बंद पडले, कारण ऐकून चक्रावून जाल..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:01 IST

1 / 5
आज जगभरात अत्याधुनिक सुविधा असलेली अनेक विमानतळं उपलब्ध आहेत. पण, काही वर्षांपूर्वी स्पेनने सर्वात मोठे आणि आधूनिक विमानतळ उभारले होते. आज तेच विमानतळ 'भुताचे विमानतळ' म्हणून ओळखले जाते. तब्बल €1.1 अब्ज (सुमारे 11,383 कोटी रुपये) खर्च करून उभारलेले हे विमानतळ फक्त तीन वर्षात बंद पडले. याचे कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
2 / 5
युरोपमधील सर्वात आधुनिक विमानतळ एक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्पेनचे ‘रियल सिउदाद विमानतळ’ (Real Ciudad Airport) आज ‘बिलियन डॉलर घोस्ट एअरपोर्ट’ म्हणून ओळखले जाते. 2009 मध्ये हे विमानतळ सुरू झाले, तेव्हा हे खरोखरच भव्यदिव्य होते. यात युरोपातील सर्वात लांब 4.1 किमी रनवे होता. दरवर्षी 1 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता होती. अत्याधुनिक टर्मिनल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरदेखील होते. परंतु, एवढा मोठा खर्च आणि आधुनिक सुविधा असूनही हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अडचणीत सापडला.
3 / 5
या विमानतळाची सर्वात मोठी चूक म्हणजे, त्याचे माद्रिदपासूनचे अंतर. हे विमानतळ राजधानीपासून जवळपास 200 किमी अंतरावर उभारले गेले. सरकारने आश्वासन दिले होते की, माद्रिदहून विमानतळापर्यंत हाय-स्पीड ट्रेन चालवली जाईल, प्रवास फक्त एक तासात पूर्ण होईल. परंतु हा रेल्वे प्रकल्प कधी सुरूच झाला नाही. प्रवासी न मिळाल्याने एअरलाईन्सने पाठ फिरवली आणि हळुहळू प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाली.
4 / 5
याचा परिणाम म्हणून, एकामागोमाग एक विमान कंपन्यांनी येथे सेवा बंद केली. 2011 मध्ये शेवटची एअरलाइनही निघून गेली आणि विमानतळ बंद पडले. उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षात हे विमानतळ बंद पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. €300 मिलियन (सुमारे 3,100 कोटी रुपये) बुडाले. पुढे कोणत्याही कंपनीने या विमानतळात रस दाखवला नाही. यादरम्यान एका चीनी कंपनीने फक्त 10 लाख रुपये इतकी अवमानकारक बोली लावली.
5 / 5
दीर्घ कायदेशीर कारवाईनंतर 2018 मध्ये विमानतळ केवळ €56 मिलियन (सुमारे 580 कोटी रुपये), म्हणजेच मूळ खर्चाच्या तुलनेत केवळ 5% किंमतीत मध्ये विकले गेले. 2019 मध्ये विमानतळ पुन्हा उघडले, परंतु प्रवाशांसाठी नाही, तर स्क्रॅपिंगसाठी. आता हे विमानतळ तुटलेल्या/निकामी विमानांचे दुरुस्ती केंद्र बनले आहे. तसेच, या ठिकाणी विमानांना स्क्रॅप केले जाते.
टॅग्स :AirportविमानतळairplaneविमानJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय