भयानक कोब्रा सापाचा कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला दंश; पण 'जे' घडलं त्याची सर्वत्र चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:59 AM2020-05-26T11:59:45+5:302020-05-26T12:05:52+5:30

सापाचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. कोब्रासारखा साप एखाद्याला चावला तर जिवंत राहणे जवळजवळ अशक्य मानले जाते. अनेकदा सर्पदंशाने माणसाचा मृत्यू होतो.

पण झारखंडमधील जामथारा जिल्ह्यातील बागदेहारीमध्ये एक अजब-गजब घटना उघडकीस आली आहे. ज्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. विषारी कोब्रा सापाने एका व्यक्तीला चावा घेतला आणि त्या व्यक्तीस काहीही झाले नाही, उलट साप मेला.

जामथारा येथील बागदेहारी पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोब्रा सापाने चावा घेतला. परंतु याचा परिणाम पोलिस कर्मचाऱ्यावर झाला नाही, तर सापाचा मृत्यू झाला.

या घटनेने सर्वांना चकित केले आहे. या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. सहाय्यक सब इन्स्पेक्टर (एएसआय) चरण बोपॉय सकाळी गणवेश घालून कामावर जात होते.

तेव्हा त्यांनी खाली पाहिलं असता सापाने त्यांना दंश केल्याचं दिसलं. बाजूला उंदराची शिकार केल्यावर त्याला कोब्रा सापाने चावल्याचं आढळून आलं.

चरण बोपॉय यांना सापाने चावताच, काही वेळाने तो साप तडफडू लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एएसआय बोपोय पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्याने या घटनेची माहिती इतर पोलिसांना दिली.

इतर पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर आढळले की, साप चावल्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही, ते पूर्णपणे निरोगी आहेत.

या घटनेनंतर एएसआय चरण बोपॉय यांचे म्हणणे आहे की ते पूर्णपणे ठीक आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. कर्तव्यावर असताना त्याला साप चावला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिस ठाण्यात दिली.

वैद्यकीय तपासणीनंतर एएसआय चरण बोपॉय यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. ते पूर्णपणे ठीक आहे आणि आपले कर्तव्य बजावत आहे.

कोब्रा सापाचे विष सर्वात विषारी मानले जाते. परंतु ही घटना चमत्कारापेक्षा काही कमी मानली जात नाही अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

टॅग्स :सापsnake