शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेत या हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, हैराण करणारं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 1:46 PM

1 / 11
एखाद्या मोठ्या गुन्ह्यासाठी मनुष्यांना फाशी दिल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्ही कधी एखाद्या हत्तीला फाशी दिल्याचं ऐकलं नसेल. ऐकायला तर हे अजब वाटतं, पण आजपासून १०४ वर्षाआधी अमेरिकेत असं झालं होतं.
2 / 11
आजच्या काळात अशा एखाद्या घटनेला प्राण्यांप्रति क्रूरता म्हणू, पण त्यावेळी अमेरिकेत जास्तीत जास्त लोकांनी हत्तीला फाशी देण्याचं समर्थन केलं होतं.
3 / 11
ही क्रूर घटना १३ सप्टेंबर १९१६ मधील आहे. जेव्हा अमेरिकेतील टेनेसी राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांसमोर मॅरी नावाच्या हत्तीला फासावर लटकवले होते. यामागचं कारणही अजब होतं. ज्याबाबत जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल.
4 / 11
चार्ली स्पार्क नावाच्या एका व्यक्तीने टेनेसीमध्ये स्पार्क्स वर्ल्ड फेमस शो नावाने एक सर्कस चालवत होता. या सर्कसमध्ये अनेक प्राणी होते. ज्यात मॅरी नावाचा एका आशियाई हत्तीही होता.
5 / 11
साधारण पाच टन वजनी मॅरी त्या सर्कसचं मुख्य आकर्षण होता. असं म्हणतात की, एक दिवस मॅरीची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने काही कारणाने सर्कस सोडली. ज्यानंतर घाईघाईत एका दुसऱ्या व्यक्तीला हत्तीच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलं.
6 / 11
नव्या व्यक्तीला मॅरी हत्तीबाबत जास्त माहिती नव्हती आणि ना मॅरीने त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवला होता. त्यामुळे मॅरीला कंट्रोल करण्यात त्याला अडचण येत होती.
7 / 11
यादरम्यान एक दिवस सर्कसच्या प्रमोशनसाठी शहरात परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात मॅरीसहीत अनेक प्राणी आणि सर्कशीतील सर्व कलाकार सहभागी झाले होते. शहराच्या मधोमध परेड सुरू होती. यादरम्यान मॅरीला रस्त्यात खाण्याची वस्तू दिसली. ज्यासाठी तो वेगाने पुढे जाऊ लागला होता.
8 / 11
व्यक्तीने मॅरीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला नाही. यादरम्यान महावतने त्याच्या कानाच्या मागे भाला मारला. ज्यामुळे हत्ती संतापला आणि त्याने वर बसलेल्या व्यक्तीला खाली पाडलं. इतकंच नाही तर त्याच्यावर आपला भारी पाय ठेवला. ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
9 / 11
ही घटना बघून लोक सैरावैरा पळू लागले होते. तेच काही लोकांना हत्तीला जीवे मारण्याचे नारे लावत गोंधळ सुरू केला होता. पण तोपर्यंत हत्ती शांत झाला होता. पण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात या घटनेला छापण्यात आलं.
10 / 11
शहरातील लोकांनी सर्कसचा मालक चार्ली स्पार्ककडे मॅरीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याच मागणी करू लागले होते. सोबतच त्यांनी धमकीही दिली की, जर असं झालं नाही तर ते शहरात पुन्हा सर्कस होऊ देणार नाही. अनेकांनी हत्तीला मारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या. कुणी म्हणालं त्याला ट्रेनखाली चिरडा तर कुणी म्हणालं त्याला शॉक द्या.
11 / 11
अखेर लोकांच्या रोषासमोर चार्ली स्पार्कला हार मानावी लागली आणि त्याने मॅरीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी १०० टन उचलू शकणाऱ्या क्रेन्स मागवण्यात आल्या. आणि १३ सप्टेंबर १९१६ ला क्रेनच्या मदतीने हजारो लोकांच्या समोर हत्तीला फाशी देण्यात आली. या घटनेला इतिहासात प्राण्याप्रति मानवतेची सर्वात क्रूर घटना मानली जाते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास