५० फूट खोल विहिरीत पडलं हत्तीचं पिल्लू; अन् शेतकऱ्याला आवाज येताच सुरू झालं रेस्क्यू; पाहा फोटो

By manali.bagul | Published: November 20, 2020 11:51 AM2020-11-20T11:51:39+5:302020-11-20T12:01:14+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीचे फोटो, व्हिडीओज खूप व्हायरल होत आहेत. तामिळनाडूच्या धरमपुरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विहिरीत पडलेल्या एका निरागस हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यात ग्रामस्थ आणि रेस्क्यू विभागाच्या टीमला यश आलं आहे.

या विहिरीत हत्तीचं पिल्लू पडल्याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. अचानक एका शेतकऱ्याने हत्तीच्या पिल्लाचा आवाज ऐकला आणि विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ही घटना धरमापुरीच्या पंचपल्ली गावातील आहे. या ठिकाणचे स्थानिक शेतकरी वेंकटचलम यांनी विहिरीवळ आवाज ऐकला. विहिरीत पडलेले हत्तीचे पिल्लू पाहताच त्यांनी ग्रामस्थांना कळवले.

ही विहिर तब्बल १०० फूट खोल आहे. प्रशासनाला या हत्तीच्या पिल्लाबद्दल माहिती दिल्यानंतर लगेचच रेस्क्यू टिमला बोलावण्यात आलं. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या हत्तीच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

घटनेबाबत माहिती मिळताच हत्तीला पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

यावेळी अग्निशमन विभागाच्या टीम व्यतिरिक्त डॉक्टरर्स आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

अनेक तास रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर हत्तीच्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.