शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात इथे सापडला दुर्मिळ पांढरा कोब्रा, बघून लोक झाले हैराण; पण तो पांढरा का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 1:23 PM

1 / 8
तामिळनाडूमधील शहर कोयंबटूरमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. वादळ सुरू आहे. या वादळामध्ये इथे असा एक जीव सापडला जो बघून सगळेच हैराण झाले आहेत. इथे एक पांढऱ्या रंगाचा कोब्रा सापडला आहे. सामान्यपणे कोब्रा साप काळ्या रंगाचा असतो किंवा भुरक्या रंगाचा असतो. पण हा कोब्रा पूर्ण पांढरा आहे. (All Photo Credit : Social Media)
2 / 8
पांढऱ्या कोब्राला वैज्ञानिक भाषेत अल्बीन कोब्रा असं म्हणतात. असा साप दिसणं फार दुर्मिळ असतं. सामान्यपणे हे दिसत नाहीत, पण पाऊस येत असेल ते बाहेर निघतात. कोयंबटूरमध्ये हा साप 3 मे रोजी बघण्यात आला.
3 / 8
नंतर वाइल्ड लाइफ अॅन्ड कंजरवेशन ट्रस्ट (WNC) चे एक्सपर्ट्सने त्याला पकडून जंगलात सोडलं. याची लांबी 5 फूट होती. हे साप चार सगळ्यात मोठ्या प्रजातींच्या सापांपैकी एक आहेत. भारतात याच्या दंशाने सगळ्यात जास्त मृत्यू होतात.
4 / 8
अल्बीनो पांढरा असणं हे एक जेनेटिक स्थिती आहे. ज्यात त्वचेत मिलेनिन तयार होतं. मिेलेनिनमुळेच त्यांचा रंग वेगळा असतो. जर आई-वडिलांकडून मिलेनिन ज्या पिल्लांमध्ये ट्रांसफर होत नाही. तेव्हा त्यांचा रंग पांढरा होतो.
5 / 8
अल्बीनो म्हणजे पांढऱ्या रंगाच्या जीवांचे डोळे लाल किंवा गुलाबी असतात. त्यांना बघण्यात समस्या होते किंवा ते पूर्णपणे दृष्टीहीन असतात. हे साप पांढऱ्या रंगाचे असल्याने त्यांना शिकारी लगेच शोधतात.
6 / 8
बऱ्याच पांढऱ्या रंगाच्या जीवांचा जीव जातोच. हा धोका केवळ पांढऱ्या रंगाच्या कोब्रामध्ये राहतो. कोयंबटूरमध्ये सापडलेला साप पूर्णपणे विकसित झाला आहे. त्याच्यावर अल्बीनो होण्याचा प्रभाव कमी आहे. तो विषारी आहे आणि बघूही शकतो. तो फिट आणि पावसामुळे बाहेर निघाला आहे.
7 / 8
WNCT च्या एक्सपर्ट्सनी सांगितलं की, हा कोब्रा पकडणं फार गरजेचं होतं. सोबतच त्याचा जीव वाचवणं देखील. कारण तो फार दुर्मिळ आहे. विषारी आहे. त्याला पकडण्याची खास ट्रेनिंग लागतं.
8 / 8
WHO नुसार, भारतात दरवर्षी 81 हजार पासून ते 1.38 लाख लोकांचा जीव सापांच्या दंशामुळे जातो. ज्यात कोब्राच्या दंशाच्या जास्त केसेस असतात. कोब्रा अनेकदा विष न टाकताच दंश मारतात. नोव्हेंबर 2022 मध्ये अशीच एक घटना समोर आली होती.
टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके