शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फाशीच्या ६ तासांनंतरही जिवंत असतो एक अवयव, जाणून घ्या कसा असतो 'तांत्रिक मृत्यू'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 11:35 AM

1 / 10
ज्युडिशिअल हॅंगिंगला 'तांत्रिक मरण' असं म्हटलं जातं, कारण यात व्यक्तीला फाशीच्या माध्यमातून अशा झटका दिला जातो ज्याने व्यक्तीची स्पाइनल कॉर्डच तुटेल. आश्चर्याची बाब म्हणजे यात मृत्यू झाल्यावरही शरीराचा एक अंग तब्बल ६ तास जिवंत राहतो.
2 / 10
कसं असतं तांत्रिक मृत्यू? फाशी म्हणजे ज्युडिशिअल हॅंगिंगला तांत्रिक मरण म्हणतात कारण एका प्रकारे झटका देऊन व्यक्तीची स्पाइनल कॉर्ड तोडली जाते. असं केल्यावर मेंदूला रक्ताचा पुरवठा लगेच बंद होतो.
3 / 10
जेल मॅन्युअल असं सांगतं की, जर व्यक्तीचं वजन ४५.३६० किलोपेक्षा कमी असेल तर त्याला २.४४४० मीटरचा ड्रॉप दिला जावा. वजन जर ४५.३३० किलो ते ६०.३३० किलो दरम्यान असेल तर त्याला २.२९० मीटरचा ड्रॉप दिला जावा. तसेच वजन जर ६०.३३० पेक्षा जास्त पण ७५.३३० पेक्षा कमी असेल तर त्याला २.१३० मीटरचा ड्रॉप दिला जावा.
4 / 10
एका फॉरेन्सिक एक्सपर्ट्सनी सांगितले की, ज्युडिशिअल हॅंगिंगवेळी दबाव वाढण्यासोबतच शरीरातील सर्व नसा बंद होतात. ब्लड सर्कुलेशन थांबतं. जर मेंदूला ब्लड सप्लाय होत नसेल तर व्यक्तीचा जीव जाण्यासाठी केवळ ५ मिनिटांचा वेळ लागतो.
5 / 10
यूकेमध्ये तयार झालेल्या कॅपिटल पनिशमेंट कमीशनने १८०१ मध्ये हे ठरवलं होतं की, लटकवल्या जाणाऱ्या व्यक्तीचं वजन १२८ पाउंड असायला पाहिजे. हे वजन कमी असेल तर दोरीला फॉल जास्त द्यावा लागेल. जेल मॅन्युअल २०१८ नुसार, फाशीच्या दिवशी व्यक्तीचं वजन केलं जातं. आणि त्यानुसार त्यांना ड्रॉप दिला जातो. जेणेकरून मान मोडण्याची घटना होऊ नये.
6 / 10
दोराची लांबी इतकीच ठेवली जाते की, ज्याने व्यक्तीचा जीव निघावा. पण त्याची मान लांब होऊ नये. असं काही होऊ नये म्हणून ज्युडिशिअल हॅंगिंगमध्ये खूपसारे नियम आहेत. त्यामुळेच शरीराच्या वजनानुसार दोराला लांबी दिली जाते.
7 / 10
तिहार जेलचे माजी जेलर सुनील गुप्ता यांनी सांगितले की, मानेचा ताण हा वजनावर अवलंबून असतो. इंग्लंडमध्ये जेव्हा फाशीबाबत पॉलिसी केली गेली होती. तेव्हा वजनाचा क्रायटेरिया ठेवण्यात आला होता. १२८ पाउंड वजन असावं आणि मानेवर ताण पडला पाहिजे.
8 / 10
वजनानुसार जेलच्या मॅन्युअलमध्ये माहिती दिलेली असते की, किती उंचीवर फॉल द्यायचा आहे. त्यानुसारच दोराची लांबी ठेवली जाते. जेल मॅन्युअलनुसार काही लोकांना जास्त यातना होतात तर काहींना कमी होतात.
9 / 10
स्पाइनल कॉर्डमध्ये फ्रॅक्टर येता डोक्याच्या भागाचं शरीराच्या इतर अवयवांशी कनेक्शन पूर्णपणे बंद होतं. पल्स साधारण २० मिनिटांपर्यंत सुरू राहते. जोपर्यंत रक्त मिळत राहील तोपर्यंत हार्ट सुरूच राहतं. ऑक्सिजन जेव्हा हळूहळू येणं बंद होतं तेव्हा हार्ट हळूहळू धडधडणं बंद करतो. हार्ट ५ ते १५ मिनिटांपर्यंत सुरूच राहतं.
10 / 10
ब्रेन डेथ झाल्यावर व्यक्तीचा मृत्यू अधिकृतरित्या घोषित केला जातो. शरीराचे सर्व अंग हळूहळू बंद होतात. मेंदू तर ५ मिनिटाच बंद पडतो. कारण त्याला सतत फूड सप्लीमेंट आणि ऑक्सजिन हवं असतं. मात्र, डोळ्यांचा कॉर्निया साधारण ६ तासांपर्यंत जिवंत असतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके