शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातली सगळ्यात सुंदर लोको पायलट म्हणजे ट्रेन ड्रायव्हर, फोटो पाहून व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:35 AM

1 / 7
Most Beautiful Train Driver: तुम्ही सामान्यपणे पुरूषांनाच रेल्वे किंवा मेट्रो चालवताना पाहिलं असेल. या इंडस्ट्रीत महिला आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे. अशात जर एखादी मॉडलसारखी महिला रेल्वे चालवत असेल तर तिला मागे वळून बघणं काही नवीन नाही. सध्या अशाच एका रेल्वे चालवणाऱ्या महिलेची चर्चा सुरू आहे.
2 / 7
कॅथरीन मुनेरा (Katherine Munera) नावाची ही महिला मॅडेलिन मेट्रोमध्ये ट्रेन ड्रायव्हर म्हणजे लोको पायलटचं काम करते. ही कोलंबियातील सगळ्यात फास्ट ट्रेन मानली जाते. या महिलेचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. तिला जगातील सगळ्यात सुंदर ट्रेन ड्रायव्हर म्हटलं जातं
3 / 7
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कॅथरीन भलेगी पुरूषांची संख्या जास्त असलेल्या इंडस्ट्रीत काम करते. पण तिला तिचं काम खूप पसंत आहे.
4 / 7
आपल्या सुंदरतेमुळे ती सोशल मीडियावर खूप पॉप्युलर आहे. टिकटॉकवर तिचे 1 लाख 25 हजार फॉलोअर आहेत. तेच इन्स्टावर 18 हजारांपेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात.
5 / 7
तिचे सुंदर आणि बिनधास्त फोटो बघण्यासाठी लोक तिला फॉलो करतात. टिकटॉकवरही तिच्या व्हिडिओजना लाखो व्ह्यूज मिळत असतात. कॅथरीन म्हणते की, तिला मॉडलिंगपेक्षा तिचं काम जास्त आवडतं.
6 / 7
ती म्हणाली की, तिने आधी ज्या देशांमध्ये काम केलं, तिथे या इंडस्ट्रीत पुरूषच जास्त होते. अलिकडेच जेव्हा ती इक्वाडोरमध्ये ट्रेनिंगसाठी गेली होती, तेव्हा तिला महिला ड्रायवर्सही भेटल्या.
7 / 7
कॅथरीन फक्त पोस्टच लोकांना आवडतात असं नाही तर तिच्या करिअच्या चॉईसचंही लोक कौतुक करतात. (Credit- Instagram/katherine_munera)
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके