शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lockdown नंतर उघडलं सलून, पुढच्या काही तासांमध्येच लखपती झाली हेअर स्टायलिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 3:26 PM

1 / 7
कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी भारतासहीत जगभरातील जास्तीत जास्त देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचे सोडून वेगवेगळे व्यवसायही बंद आहेत. अर्थातच यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
2 / 7
मात्र, आता प्रत्येक देशात लॉकडाउनमध्ये काही सूट देण्यात येत आहे. ज्यामुळे सलूनही सुरू झाले आहेत. अमेरिकेत सलून सुरू झाले असून एका सलूनची मालकीन काही तासांमध्येच लखपती झाली.
3 / 7
अमेरिकेतील कोलोराडो राज्यात लॉकडाउननंतर पुन्हा एकदा सलून सुरू झाले. अशात एका सलूनची मालकीन आणि हेअर स्टायलिस्ट इलिसिया नोवोटनी दुकानात ग्राहकांची वाट बघत होत्या.
4 / 7
दरम्यान दिवसा साधारण 1 वाजता एक ग्राहक त्यांच्या सलूनमध्ये आला आला आणि केस कापल्यावर त्याने टिप म्हणून महिलेला अडीच हजार दिले. आणि तिथून निघून गेला.
5 / 7
नोवोटनीने सांगितले की, ती अनेक दिवसांपासून दुकान उघडण्याची वाट बघत होती. सलून उघडल्यावर एक फारच सामान्य ग्राहक केस कापायला आला आणि त्यानंतर तो रक्कम देऊन गेला.
6 / 7
इतकेच नाही तर महिलेने सांगितले की, त्या व्यक्तीने मॅनेजरला एक हजार डॉलर, रिसेप्शनिस्टला 500 डॉलरची टीप देऊन गेला. जर ही रक्कम भारतीय करन्सीत बदलली तर 1 लाख 89 हजार रूपयांच्या जवळपास होईल.
7 / 7
महिला हेअरस्टायलिस्टने त्या व्यक्तीला धन्यवाद देत म्हटले की, 'या पैशांची त्यांना फार गरज होती. आम्ही हे सांगू शकत नाही की, हे पैसे आमच्यासाठी किती महत्वाचे आहेत'.
टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके