अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:27 IST
1 / 8Kedareshwar Cave Temple: जगभरात अनेक अशी मंदिरं आहेत ज्यांबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी प्रचलित आहेत. ही मंदिरं आपल्या वास्तुकलेसाठी आणि वेगळ्या मान्यतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशाच एका प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत, जे केवळ एका पीलरवर उभं आहे.2 / 8राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगढ किल्ल्यावर हे मंदिर आहे. हे मंदिर केदारेश्वर मंदिर नावानंही ओळखलं जातं. हे मंदिर एका गुहेत आहे. या मंदिराचं हेच वेगळे पण लोकांना याकडे आकर्षित करतं.3 / 8या मंदिराचं निर्माण कलचुरी राजवंशात ६ व्या शतकात करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. येथील गुहेच्या मधोमध एक ५ फूट उंच शिवलिंग आहे. याच्या चारही बाजूच्या चार खांबांपैकी ३ तुटलेले आहेत आणि केवळ एका खांबावर हे सगळं मंदिर टिकून आहे. 4 / 8एकाच खांबावर मंदिराचं पूर्ण छत टिकून आहे. असं सांगितलं जातं की, जेव्हा हा चौथा खांब पडेल तेव्हा मंदिरही पडू शकतं. 5 / 8असं सांगितलं जातं की, हे चार खांब चार युग म्हणजे सत युग, त्रेता युग, द्वापर युग आणि कलयुगाचा प्रतिनिधित्व करतात. शिल्लक असलेला चौथा खांब कलयुग दर्शवतो असं मानलं जातं. 6 / 8हे मंदिर हरिश्चंद्रगढ किल्ल्याच्या आता जवळपास 4,671 फुटाच्या उंचीवर बनलं आहे. येथील शिवलिंग हे खास मानलं जातं. शिवलिंगापर्यंत पोहोचण्यासाठी ३ ते ४ फूट पाण्यातून जावं लागतं.7 / 8बाराही महिने शिवलिंगाच्या चारही बाजूने पाणी राहतं. असं म्हटलं जातं की, वातावरणानुसार पाण्याचं तापमानही बदलतं. उन्हाळ्यात हे पाणी थंड असतं आणि तर हिवाळ्यात कोमट होतं.8 / 8वेगवेगळ्या ठिकाणांहून भाविक इथे दर्शनासाठी येतात. अशी मान्यता आहे की, शिवलिंगाच्या चारही बाजूने जमा पाण्यात डुबकी मारली तर पापं धुतली जातात.