बोंबला! मुलगी पटली नाही म्हणून बॉडी बिल्डरनं चक्क Sex Dall सोबत केलं लग्न; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:01 PM2020-12-09T18:01:51+5:302020-12-09T18:35:58+5:30

प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि प्रेमात लोकांची काहीही करण्याची तयारी असते. असं तुम्ही नक्कीच ऐकले असेल. पण प्लास्टीकच्या बाहूलीवर प्रेम करून तिच्याशी लग्न केल्याची घटना तुम्ही याआधी कधीही ऐकली नसेल.

कझाकिस्तानचा रहिवासी असलेल्या एका तरूणाने आपल्या सगळ्या नातेवाईकांसमोर तसंच मित्रांसमोर एका बाहूलीशी लग्न केल आहे. या बाहूलीचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला ही बाहूली खोटी आहे. यावर विश्वासच बसणार नाही.

सगळ्यात आधी या बॉडी बिल्डरने बाहूलीशी साखरपूडा केलं आणि मग लग्न केलं. या बाहूलीचं नाव मार्गो ठेवण्यात आलं आहे. मार्गो आणि युरी टोलोचकोची भेट एका डिस्कोमध्ये झाली होती.

मार्गो एक सेक्स डॉल असल्याचे म्हटलं जात आहे. तर युरीने आपल्या लग्नाचे आणि मार्गोसोबत घालवलेल्या अनेक क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हा विचित्र प्रकार पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले आहेत.

युरीचे इन्स्ट्राग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. युरी बॉडी बिल्डर आहे. असं असूनही मुलीशी लग्न करण्याऐवजी युरीने एका बाहुलीशी लग्न केलं आहे.

युरीने मार्गो डॉलसोबतच्या लग्नाचे व्हिडीओज सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Read in English