शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता?... 'या' गावात फक्त दोघचं राहतात, तरीही घेतलीय कोरोनाची धास्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 6:39 PM

1 / 10
जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 10
अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना मास्क घालण्याचे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत जात आहे.
3 / 10
दरम्यान, इटलीमधील हॅमलेट या छोट्याशा गावात फक्त दोन व्यक्ती राहत असून ते कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करत आहेत. या गावात जिओव्हनी कॅरीली (८२) आणि जिआम्पियरो नोबिली (७४) राहतात.
4 / 10
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, गावात या दोघांच्या शेजारी कोणीही नाही. तरीही या सेवानिवृत्त वृद्धांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची इच्छा नाही. त्यामुळे हे दोघे कधीही हे गाव सोडून गेले नाहीत. हे गाव पेरूजा प्रांतातील उंब्रियामध्ये आहे.
5 / 10
दोन लोकसंख्या असलेले इटलीतील हे गाव पर्यटनसाठी खूप लोकप्रिय आहे. हे गाव सुमारे ९०० मीटर उंचीवर आहे. याठिकाणी लोकांना पोहचण्यास आणि परतण्यास खूप अडचणीचा सामना करावा लागतो.
6 / 10
गावात कोणीही शेजारी नसले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कॅरोली आणि नोबिली हे देखील मास्क लावतात. कॅरीली यांनी सीएनएनला सांगितले की, 'व्हायरसमुळे मृत्यूची भीती आहे. जर मी आजारी पडलो तर कोण माझी काळजी घेईल? मी म्हातारा झालो आहे. मात्र, मेंढ्या, मधमाशी आणि बागेची देखरेख करण्यासाठी मला येथे राहायचे आहे. मी माझे आयुष्य खूप चांगले जगत आहे.'
7 / 10
सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष करणे आणि आपले आयुष्य धोक्यात घालणे, या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत असे नोबली यांना वाटते. त्यांनी सीएनएनला सांगितले, 'केवळ आरोग्यामुळे मास्क आणि सामाजिक अंतर यासंबंधीचे नियम पाळू नका. यामध्ये काहीही चांगले किंवा वाईट नाही. जर हा नियम असेल तर आपण ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी पाळले पाहिजे.'
8 / 10
दरम्यान, जगभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. अमेरिका, ब्राझिलसह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतात सुद्धा कोरोनाची सख्या मोठी आहे.
9 / 10
भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५५,७२२ नवे रुग्ण (Positive Patient) आढळून आले आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत गेल्या २४ तासात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच, मृतांचा आकडा देखील घटला आहे.
10 / 10
भारतात गेल्या २४ तासात देशात ५७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) देशात आता ७ लाख ७२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटली