या तीन बहिणी दिसतात पूर्णपणे एकसारख्या, बॉयफ्रेन्डही होतात कन्फ्यूज...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:55 PM2021-10-06T14:55:12+5:302021-10-06T15:00:07+5:30

निसर्गाची जादूच वेगळी आहे. आतापर्यंत तुम्ही जुळ्या भावांबाबत आणि बहिणींबाबत ऐकलं असेल. पण ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या तीन बहिणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण आहे त्यांचे एकसारखे लूक.

मनुष्यांची तुलना कुणासोबत केली जाऊ शकत नाही. निसर्ग कधी काय कमाल दाखवेल हेही काहीच सांगता येत नाही. अशात तुम्ही जुळ्यांबाबत आणि तिळ्यांबाबत ऐकल असेलच. पण आज ज्यांच्याबाबत तुम्हाला सांगणार आहोत, त्यांच्याबाबत जगाला जास्त माहीत नाही. एकत्र जन्माला आलेल्या तीन बहिणींचे चेहरे, उंची, बांधा आणि वय सगळं काही एकसारखं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या तिघी इतक्या एकासारख्या दिसतात की, त्यांचे बॉयफ्रेन्डही कन्फ्यूज होतात.

रिपोर्ट्सनुसार, सेरेना, केले आणि एलिस यांचे चेहरे एकसारखे असल्यने त्यांचे बॉयफ्रेन्डही नेहमीच कन्फ्यूज होतात. पण यातील सध्या एकच रिलेशनशिपमध्ये आहे. तिघी बहिणींचं बॉंडींग चांगलं आहे.

या तिनही बहिणी ब्रिटनच्या केंटमधील आहेत. डेली मेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, यांची नावं आहेत सेरेना, केले आणि एलिस टेरी. तिन्ही बहिणी टेरी ट्रिपल्स नावाने लोकप्रिय आहेत. त्यांच्यात इतकं साम्य आहे की अनेकदा तर जवळचे लोकही कन्फ्यूज होतात.

टेरी ट्रिपलेट्स नेहमीच आनंदी राहतात. पण या तिघींचे चेहरे एकसारखे असल्याने त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्या जास्तीत जास्त वेळ सोबतच राहतात. तिघी सोबतच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. इतकंच काय तर अनेकदा त्या एकसारखे कपडेही घालतात. एकसारखं मेकअप करतात.

इन्स्टाग्रामवर Teri.Triplets नावाने त्यांचं अकाउंट आहे. यावर त्या त्यांचे फोटो नेहमीच शेअर करत असतात. तेच टिकटॉकवरही त्यांचे साधारण एक मिलियन फॉलोअर्स आहेत. त्या काही ब्रॅन्डच्या अॅम्बेसेडरही आहेत.

रिपोर्ट्सनुसार, सेरेना, केले आणि एलिस यांचे चेहरे एकसारखे असल्यने त्यांचे बॉयफ्रेन्डही नेहमीच कन्फ्यूज होतात. पण यातील सध्या एकच रिलेशनशिपमध्ये आहे. तिघी बहिणींचं बॉंडींग चांगलं आहे.