शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IFS अधिकाऱ्याच्या पत्नीचा जगभरात धुमाकूळ, अनेक मंत्र्यांकडून कौतुक; जाणून घ्या कोण आहेत ढोली मीना?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 4:42 PM

1 / 8
युरोपमधील माल्टा देशात आयएफएस अधिकारी लोकेश मीना यांच्यासोबत राहणाऱ्या त्यांच्या पत्नी धोली मीना या राजस्थानी संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जातात. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील धोली मीना यांनी अलीकडेच (जुलैमध्ये) स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि इटली या तीन युरोपीय देशांचा प्रवास केला आहे.
2 / 8
धोली मीना यांनी स्वित्झर्लंडमधील कृष्ण मंदिर, झुरिच येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन भारतीय संस्कृतीच्या संवर्धनात योगदान दिले. धोली मीना यांच्या म्हणण्यानुसार, स्वित्झर्लंड, हॉलंड, रशिया, इटली, फ्रान्स अशा विविध देशांतील लोकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अंगीकार केला.
3 / 8
तीन देशांच्या दौऱ्यात धोली मीना यांनी शहरांपेक्षा गावांमध्ये जाऊन तेथील पुरातत्वीय ठिकाणे पाहण्याबरोबरच संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील गावे विकसित असल्याचे त्यांनी सांगितले.
4 / 8
स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि इटलीमधील शेतकरी शेती आणि दुग्ध व्यवसाय या दोन्ही व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. येथील जनता आपल्या देशाच्या आणि राज्याच्या कितीतरी पटीने पुढे आहे, असेही त्या म्हणाल्या.
5 / 8
धोली मीनाने माल्टा देशातील घूमर सादर करून जगभरातील लोकांना राजस्थानच्या संस्कृतीची जाणीव करून दिली होती. यानंतर केंद्रीय कायदा आणि सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि राजसमंद लोकसभा खासदार राजकुमारी दिया कुमारी यांनी त्यांचे कौतुक केले.
6 / 8
धोली मीना या राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील निमाली गावच्या रहिवासी आहेत. धोली मीनाचा विवाह भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी लोकेश मीना यांच्याशी 2006 मध्ये झाला होता. लग्नानंतर ढोली मीना यांचे आयुष्य बदलले आणि 2010 मध्ये पहिल्यांदाच त्या पतीसोबत परदेशात गेल्या.
7 / 8
तेव्हा त्या आफ्रिकेला गेल्या होत्या. आफ्रिकेत धोली मीना 2014 पर्यंत पतीसोबत राहिल्या. त्यानंतर पती लोकेश मीना यांची अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासात बदली करण्यात आली. त्यानंतर पती-पत्नी दोघेही 2014 ते 2019 पर्यंत अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहत होते.
8 / 8
यानंतर जुलै 2021 मध्ये, धोली मीना यांचे पती लोकेश मीना यांची माल्टा, युरोपमधील भारतीय उच्चायुक्तालयात बदली झाली आणि तेव्हापासून त्या माल्टामध्ये आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयRajasthanराजस्थान