By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:37 IST
1 / 7सोन्याचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. अशात आता वाळवंटाखाली दडलेलं तेलच नाही तर सोनंही सौदी अरेबियाचं नशीब बदलून टाकणार आहे. सौदी अरबमध्ये सोन्याची चमक सगळीकडेच बघायला मिळते. तेलामुळे आधीच जगात आपली ताकद दाखवणारा सौदी अरेबिया आता सोन्यामुळेही आपल्या अर्थव्यवस्थेला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.2 / 7आपण काही व्हिडिओंमध्ये पाहिलं असेल की, सौदी अरेबियामधील लग्ने केवळ कौटुंबिक कार्यक्रम नसतात. इथे लग्ने प्रतिष्ठा आणि समाजातील त्यांच्या स्टेटस प्रतीक मानली जातात. इथे महागडे गिफ्ट मिळणं फारच सामान्य आहे आणि सोन्याची नाणी किंवा भरपूर दागिने गिफ्ट करणं परंपरेचा भाग आहे. इथे नवरी-नवरदेवाला किलोच्या हिशोबाने सोनं देण्यात येत असल्याच्या घटना तर आपण ऐकल्या असेलच. सोनं इथे केवळ दागिने किंवा महागडा धातू नाही तर सुरक्षा आणि सन्मानाचं प्रतीक आहे.3 / 7World Gold Council च्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाकडे साधारण ३२३.१ टन सोन्याचा भांडार आहे. या आकडेवारीसोबत सौदी अरेबिया अरब देशांमध्ये सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. तर जगाच्या केंद्रीय बँकांच्या यादीत सौदी टॉप २० मध्ये सामिल आहे. सोन्याचा हा भांडार दाखवतो की, देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे.4 / 7सौदी सेंट्रल बँक म्हणजेच जिला SAMA असंही म्हणतात. ही बँक आंतरराष्ट्रीय बाजारातून वेळोवेळी सोनं खरेदी करते आणि विकतेही. याचा उद्देश परदेशी चलन भांडारात विविधता आणणं आणि धोका कमी करणं.5 / 7जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता वाढत किंवा डॉलरची किंमत कमी होते, तेव्हा सोनं एक सुरक्षित पर्यायाच्या रूपात काम करतं. अलिकडे मक्का क्षेत्राच्या अल खुरमा प्रांतात Mansourah-Massarah जवळ सोन्याचा मोठा भांडार सापडल्याची माहिती समोर आली आहे.6 / 7सुरूवातीच्या चाचणीतून असं समोर आलं आहे की, इथे फार मोठ्या प्रमाणात सोनं आहे. जर पुढील चाचण्या योग्य पद्धतीने पार पडल्या तर येणाऱ्या वर्षात सौदीची उत्पादन क्षमता अनेक पटीने वाढू शकते.7 / 7सौदीची अर्थव्यवस्था फार लांब काळापासून तेलावर अवलंबून राहिली आहे. पण तेलांच्या किंमतीतील चढ-उतारामुळे आर्थिक संतुलन प्रभावित होतं. अशात सोनं फार सेफ ठरतं. महागाई, वैश्विक मंदी किंवा आर्थिक संकटात सोनं सुरक्षा कवच बनतं.