फक्त एक छोटी चेन खेचून इतकी लांब रेल्वे कशी थांबते? चेनचं खरं नावही अनेकांना नसेल माहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:46 IST2025-07-28T16:16:03+5:302025-07-28T16:46:04+5:30

Indian Railway Facts : कधी प्रश्न पडलाय का की, केवळ छोटीशी चेन खेचून इतकी मोठी रेल्वे कशी थांबवली जाते? तेच आज पाहुयात.

Indian Railway Facts : भारतात रोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात. रेल्वे प्रवास करण्याची आपलीच एक गंमत असते. आपणही कधीना कधी रेल्वेनं प्रवास केला असेलच. रेल्वेनं प्रवास केला असेल इमर्जन्सीमध्ये रेल्वेतील एक चेन खेचून रेल्वे थांबवता येते हेही माहीत असेलच. पण कधी प्रश्न पडलाय का की, केवळ छोटीशी चेन खेचून इतकी मोठी रेल्वे कशी थांबवली जाते? तेच आज पाहुयात.

अनेकांना हे माहीत नसेल की, रेल्वेमधील चेनचं खरं आणि पूर्ण नाव Alarming Chain Pulling (ACP) असं आहे. जर इमर्जन्सीमध्ये रेल्वे थांबवायची असेल तर ही चेन खेचावी लागते. तर मुळात ही चेन थेट ब्रेकिंग सिस्टीमसोबत जुळलेली असते. चेन खेचल्यावर रेल्वेच्या पाइपलाईनमधील हवेचा दबाव कमी होतो. ज्यामुळे ब्रेक अॅक्टिवेट होतात आणि रेल्वे हळूहळू थांबते.

या सिस्टीममागे एक मेकॅनिकल टेक्निक काम करते. जेव्हा एखादा प्रवासी चेन खेचतो, तेव्हा एका विशेष व्हॉल्व ओपन होतो, जो थेट रेल्वेच्या एअर ब्रेक सिस्टीमशी जुळलेला असतो.

भारतीय रेल्वेमध्ये सामान्यपणे कम्प्रेस्ड एअर ब्रेक टेक्निकचा वापर केला जातो. जी सगळ्याच कोचना जोडणाऱ्या पाइपलाईनमध्ये सतत दबावयुक्त हवा प्रवाहित करत असते, ज्यामुळे रेल्वे ब्रेक खुले राहतात.

चेन खेचल्यावर व्हॉल्व ओपन झाल्यावर हवा वेगानं बाहेर निघते आणि पाइपलाईनमधील प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी झाल्यावर ब्रेक सिस्टीम याला सुरक्षा संकेत समजते आणि स्वत:ही सक्रिय होतं. ब्रेक लागतात आणि रेल्वे थांबते.

आजकालच्या मॉडर्न रेल्वेंमध्ये जसा एखादा प्रवाशी इमरजन्सीमध्ये चेन खेचतो लोको पायलटच्या कंट्रोल पॅनलवर लगेच एक लाइट लागतो किंवा अलार्म वाजतो, ज्यामुळे त्यांना हा संकेत मिळतो, कोणत्या कोचमधून चेन खेचली गेली.

रेल्वेतील गार्ड लगेच त्या कोचमध्ये जातात आणि संबंधी व्यक्तीकडून चेन खेचण्याचं कारण विचारतात. चेन उगाच तर खेचण्यात आली नाही ना हे स्पष्ट केलं जातं. चेनची सुविधा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिली आहे. त्याचा गैरवापर होऊ नये. जर एखाद्या व्यक्तीनं विनाकारण चेन खेचली तर हा कायदेशीर गुन्हा आहे. व्यक्तीला तुरूंगवास किंवा १ हजार रूपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.