शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रस्त्यात एक्स गर्लफ्रेन्ड समोरच बंद पडली नवरदेवाची कार, इच्छा नसूनही तिच्याशीच करावं लागलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 2:48 PM

1 / 10
तीन वर्षांपासून सुरू असलेलं प्रेम प्रकरण विसरून एक व्यक्ती दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी निघाला होता. मात्र, त्याच्या नशीबात काहीतरी वेगळंच होतं.
2 / 10
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेव बनून ही व्यक्ती सजलेल्या कारमधून प्रेयसी राहते त्या परिसरातून जात होती. अचानक कार बिघडली आणि समोरून स्कूटीवरून प्रेयसी आली. भर रस्त्यात दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि दोघांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. काही तासांनी दोघांना लग्न करावं लागलं.
3 / 10
पंजाबच्या मोगाजवळील एका गावात राहणाऱ्या जगसीर सिंह याचं त्याच गावात राहणारी महिला जसप्रीस कौरसोबत तीन वर्षांपासून अफेअर सुरू होतं. (सांकेतिक छायाचित्र)
4 / 10
या महिलेची आधी दोन लग्ने झाली होती आणि तिला एक मुलगीही आहे. जगसीर सिंह या महिलेसोबतचे अनैतिक संबंध सुरूच ठेवून दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघाला होता.
5 / 10
बुधवारी जगसीर सिंह नवरदेव बनून कोटकुपुरा येथील एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी जात होता. दरम्यान त्याची कार अचानक रस्त्यात खराब झाली. जिथे कार बंद पडली तिथेच त्याची प्रेयसी काम करत होती.
6 / 10
कार बिघडल्याने नवरदेवाला कारमधून बाहेर यावं लागलं. इतक्यात महिला तिचं काम करून स्कूटीवरून घरी जात होती. अशात तिची नजर नवरदेवाच्या कपड्यात असलेल्या प्रियकरावर पडली. ती त्याला असं पाहून चांगलीच संतापली.
7 / 10
ती कारवर लावलेली फुले फेकू लागली. इतकेच नाही तर दोघांमध्ये वाद होऊन हाणामारीही सुरू झाली. नंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. (सांकेतिक छायाचित्र)
8 / 10
पोलीस स्टेशनमध्ये दोन तासांच्या चर्चेनंतर असा निर्णय झाला की, नवरदेव त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करणार. पोलीस स्टेशनमध्ये दोघांनी तसे लिहून दिले आणि घरी जाऊन त्यांनी लग्न केले.
9 / 10
नवरदेव जगसीर सिंह हा लुधियाना बायपासजवळील एका बिल्डींगमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. तर महिला जसप्रीत कौर मोगा-लुधियाना रोडवरील बिल्डींगमध्ये लोकांच्या घरातील कामे करते.
10 / 10
जसप्रीतचं आधीही दोनदा लग्न झालं होतं. पहिला पती लग्नाच्या 6 महिन्यांनंतर एक महिलेला घेऊन पळून गेला. दुसरं लग्न येथील सूरज नगरमध्ये झालं होतं. तोही सोडून गेला. त्याच्याकडून एक मुलगी आहे. आता गेल्या तीन वर्षांपासून जसप्रीत आणि जगसीर यांचं अफेअर होतं.
टॅग्स :Punjabपंजाब