शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:33 IST

1 / 6
ब्राझीलमध्ये नुकतीच एका गायीची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्याने भारतात आढळते.
2 / 6
ब्राझीलमधील मिनास जेरायज या राज्यात नेल्लोर प्रजातीच्या एका गायीला नुकताच जगातील सर्वात महागड्या गायीचा दर्जा मिळाला आहे. ही गाय एकूण 31 कोटी रुपयांमध्ये विकली गेली आहे.
3 / 6
या नेल्लोर प्रजातीच्या गायीचे वजन 1,101kg एवढे आहे. जे याच प्रजातीच्या इतर गायींच्या तुलनेत साधारणपणे दुप्पट आहे. ही गाय दिसायलाही अत्यंत सुंदर आणि आकर्षक.
4 / 6
ब्राझीलमधील या सर्वात महागड्या गायीचे नाव वियातिना 19 असे आहे. गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये हिला जगातील सर्वात महागड्या गायीचा दर्जा मिळाला आहे.
5 / 6
वियातिना 19 ची त्वचा तिला गर्मी सहन कण्याची शक्ती देते. तसेच तिचा खांदा फॅट स्टोर असते. ज्यातूनही तिला शक्ती मिळते.
6 / 6
नेल्लोर ही प्रजाती मुळची भारतातील आंध्र प्रदेशातील आहे. या प्रजातीची जनावरे अत्यंत मजबूत असतात. ते गर्मी असो अथवा थंडी, कुठल्याही वातावरणात अगदी सहजपणेराहू शकतात. यामुळे यांना जागतीक बाजारातही मोठी मागणी असते.
टॅग्स :cowगायBrazilब्राझीलAndhra Pradeshआंध्र प्रदेशIndiaभारत