Diwali 2019 : दिवाळीत हटके पद्धतीने सजवा घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 15:48 IST2019-10-29T15:40:59+5:302019-10-29T15:48:03+5:30

दिवाळीची सर्वत्र धामधूम पाहायला मिळत आहे. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीसाठी खासकरून घर सुंदररित्या सजवलं जातं.
घरातील जुन्या वस्तुंना हटके आणि आकर्षक लूक देऊन घर दिवाळीच्या निमित्ताने सजवता येईल. टाकाऊपासून टिकाऊचा वापर करून यंदाची दिवाळी खास करा.
जुन्या बांगड्या या फेकून दिल्या जातात. मात्र त्यापासून उत्तम वस्तू बनवता येतात.
बाजारात रंगीबेरंगी सुंदर दिवे मिळतात. मात्र घरातील जुन्या वस्तूंपासून दिवा तयार करण्यात वेगळीच मजा असते.
चहा, कॉफी, कुकीजचे रिकामे कंटेनर्स असतात. ते फेकून देण्याऐवजी वेगवेगळ्या रंगांनी रंगवा.
छोटी झाकणं किंवा बांगड्यांना सुंदर रंग देऊन छानशा शोभेच्या वस्तू तयार करता येतात.
नवीन कप आणल्यानंतर जुने कप तसेच पडून राहतात. त्याचा वापर करून आकर्षक मेणबत्त्या अथवा दिवे तयार करता येतात.