आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:11 PM2021-04-15T16:11:04+5:302021-04-15T16:21:23+5:30

डायनासॉर ज्या ठिकाणी जात होते तिथे आपल्या मल किंवा उलटीसोबत पोटातील स्टोन्स काढत होते. तसेच काही स्टोन्स आता वैज्ञानिकांना सापडले आहेत.

ज्याप्रमाणे किडनी आणि गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स म्हणजे खडे आढळतात. तसेच कोट्यावधी वर्षांआधी डायनासॉरच्या पोटातही स्टोन्स मिळत होते. वैज्ञानिकांना हे यावरून समजलं की, डायनासॉरला जेव्हा वेदना होत होत्या किंवा त्यांना धोक्याची जाणीव होत होती तेव्हा ते एकदाच १ हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करायचे. हे काम जास्त लांब मान असलेले शाकाहारी डायनासॉर्सनी केलं होतं. हे ज्या ठिकाणी जात होते तिथे आपल्या मल किंवा उलटीसोबत पोटातील स्टोन्स काढत होते. तसेच काही स्टोन्स आता वैज्ञानिकांना सापडले आहेत. (All Image Credit _ Getty)

जे स्टोन्स वैज्ञानिकांना सापडले आहे त्यांचा रंग गुलाबी भुरका आहे. अमेरिकन वैज्ञानिकांनी सांगितले की, अमेरिकेतील विस्कॉन्सिनपासून १ हजार किलोमीटर दूर असलेल्या व्योमिंगमध्ये सापडले. कारण डायनासॉर विस्कॉन्सिनहून व्योमिंगपर्यंत गेले होते. दोन्ही ठिकाणांच्या रस्त्यांवर त्यांच्या पायांचे निशाण आणि जुरासिक काळातील संबंधित प्राचीन पुरावे मिळाले आहेत.

ऑस्टिन स्थित यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायन्सेसच्या ग्रॅज्युएट स्टुडेंट आणि या रिसर्चचे मुख्य जोश मॅलोन यांनी सांगितले की, हे स्टोन्स देशातील दक्षिण भागातील विस्कॉन्सिन ते उत्तर-मध्य व्योमिंगपर्यंत डायनासॉरच्या पोटात गेले होते.

न्यूयॉर्कमधील आडेल्पी यूनिव्हर्सिटीचे बायोलॉजी विभागाचे असोसिएट प्रोफेसर मायकल डेमिक यांनी सांगितले की, डायनासॉरच्या पोटातील स्टोन्सना गॅस्ट्रोलिथ्स म्हणतात. अनेक डायनासॉर हे स्टोन्स खाऊन पोटातील अन्न पचवतात. हे स्टोन्स पोटात जाऊन ग्राइंडरचं काम करतात.

मायकल डेमिक म्हणाले की, ही बाब स्पष्ट नाही की, ते जागा बदलत असताना असं का करतात. होऊ शकतं की, त्यांना अन्न लवकर पचवून जास्त अंतर पार करण्यासाठी एनर्जीची गरज असेल. यादरम्यान जोश मॅलोनने सांगितले की, माझे वडील डेविड मॅलोनही पॅलेटियोलॉजिस्ट आहेत. त्यांनी २०१७ मध्ये व्योमिंगमध्ये असे स्टोन्स शोधले होते. त्यावेळी मी जिओलॉजीचा विद्यार्थी नव्हतो. मी माझ्या वडिलांचं काम बघण्यासाठी गेलो होतो.

जोशने सांगितले की, मी वडिलांसोबत बिगहॉर्न बेसिनमध्ये फिरत होतो. तिथे चारही बाजूने असे गुलाबी भुऱ्या रंगाचे स्टोन्स पडले होते. मी वडिलांना विचारलं की, हे काय आहे. तेव्हा वडिलांनी याबाबत सांगितलं होतं. त्यावेळी हे गॅस्ट्रोलिथ्स असल्याचा अंदाज होता. आता आमच्या टीमने ते सिद्ध केलंय.