शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diamond Crossing: चहुबाजूंनी येतात रेल्वे पण अपघात होत नाही; अशी असते 'डायमंड क्रॉसिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 3:34 PM

1 / 8
Indian Railway Diamond Crossing: आपली भारतीय रेल्वे विविधतेने नटलेली आहे, या भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टी तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील.
2 / 8
भारतीय रेल्वेबाबत अशाच प्रकारची एक अनोखी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारतात एक असा रेल्वे ट्रॅक आहे, जिथे चार बाजूंनी ट्रेन येते, पण कधीच ट्रेनचा अपघात होत नाही.
3 / 8
भारतीय रेल्वेच्या या अनोख्या गोष्टीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. ज्यांना ही गोष्ट आताच माहित झाली आहे, त्यांना हे पाहून अश्चर्य वाटेल. विशेष म्हणजे, या ट्रॅकवर चारही दिशांनी गाड्या आल्यावरही त्यांची टक्कर होत नाही.
4 / 8
तुम्ही अनेकदा दोन रेल्वे ट्रॅक एकमेकांमधून आलेले पाहिले असतील. या दरम्यान क्रॉसिंग ट्रॅकवरून गाड्या कशा जातात, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.
5 / 8
याशिवाय रेल्वे रुळांमध्ये एक विशेष प्रकारचा क्रॉसिंग ट्रॅकदेखील आहे. याला डायमंड क्रॉसिंग ट्रॅक म्हणतात. डायमंड क्रॉसिंग जगात फार कमी ठिकाणी आहे. डायमंड क्रॉसिंगवरून चारही दिशांनी गाड्या जातात.
6 / 8
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारताच्या एवढ्या मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये फक्त एकाच ठिकाणी डायमंड क्रॉसिंग आहे. डायमंड क्रॉसिंग हा एक पॉइंट आहे, जिथे रेल्वे ट्रॅक चारही दिशांनी एकमेकांना ओलांडतात.
7 / 8
रस्त्याचे दुभाजकाप्रमाणेच हे डायमंड क्रॉसिंग असते. याला तुम्ही रेल्वे ट्रॅकचे छेदनबिंदू म्हणू शकता. त्यात चार रेल्वे मार्गांचा समावेश असतो. दिसायला हा ट्रॅक हिऱ्यासारखा दिसतो, यामुळेच त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात.
8 / 8
यामध्ये एकाच ठिकाणी चार रेल्वे ट्रॅक दिसत आहेत. भारतात फक्त नागपूरला डायमंड रेल्वे क्रॉसिंग आहे. त्यात पूर्वेकडील गोंदियाचा एक ट्रॅक आहे, जो हावडा-रौकेला-रायपूर मार्ग आहे. दक्षिणेकडूनही एक ट्रॅक येतो. एक ट्रॅक दिल्लीहून येतो आणि एक ट्रॅक पश्चिम मुंबईतून येतो.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटकेnagpurनागपूर