शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनातून जीव वाचला म्हणून भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला दिलं साडे तीन किलोचं सोनं दान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 1:16 PM

1 / 9
आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात २४ फेब्रुवारीला आपली मनोकामना पूर्ण झाल्याने एका भक्ताने २ कोटी रूपयांचं सोन्याचं शंखचक्र अर्पण केलं. असे सांगितले जात आहे की, तामिळनाडूच्या थेनीमध्ये राहणाऱ्या भक्ताने बालाजीकडे नवस बोलला होता. कोरोनामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली होती. आता देवाच्या कृपेने बरे झाले आहेत. यानंतर त्यांनी मंदिराला दोन कोटी रूपयांचं सोन्याचं शंख आणि चक्र भेट दिलं. सोन्याच्या या वस्तूंचं वजन साडे तीन किलो आहे.
2 / 9
तिरूपती बालाजी हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. सोबतच बालाजीला भारतातील सर्वात श्रीमंत देवता असल्याचा मान मिळाला आहे. चला जाणून घेऊ देशातील या सर्वात श्रीमंत देवताबद्दल...
3 / 9
२ कोटीच्या शंखचक्रच्या दानानंतर पुन्हा एकदा तिरूपती बालाजी मंदिर चर्चेत आलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिराच्या मुख्य देवतेला हे दागिने घातले जातील. हे पहिल्यांदाच नाही की, मंदिरातील देवतेला सोनं चढवलं गेलं. इथे नेहमीच सोनं दान दिलं जातं.
4 / 9
तिरूपती बालाजी मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गणलं जातं. इथे भगवान विष्णु विराजमान आहेत. लोक इथे आपल्या मनोकामना घेऊन येतात आणि जेव्हा या मनोकामना पूर्ण होतात तेव्हा ते इथे पैसे, सोनं अर्पण करतात. त्यामुळे नेहमीच येथील दानपेटी भरलेली राहते.
5 / 9
कॅशसोबतच लोक इथे सोनंही दान करतात. एका अंदाजानुसार, मंदिराच्या खजिन्यात आठ टन आभूषणे आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या बॅंकेत मंदिराच्या नावाने ३ हजार किलो सोनं जमा करण्यात आलं आहे.
6 / 9
केवळ सोनंच नाही तर मंदिरात मोठ्या प्रमाणात कॅशही दान केली जाते. अनेक बॅंकात मंदिराच्या नावाने १ हजार कोटी रूपयांची एफडीही आहे. रिपोर्ट्सनुसार, तिरूपती बालाजी मंदिराची वार्षिक कमाई ६५० कोटी रूपये इतकी आहे.
7 / 9
तिरूपती बालाजी दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. आता मंदिराची एकूण संपत्ती ५० हजार कोटी असल्याचे सांगितले जाते. केवळ नवरात्रीच्या काळात मंदिरात १२ ते १५ कोटी दान मिळतं.
8 / 9
मंदिराची काळजी घेण्यासाठी, व्यवस्थेसाठी हजारो कर्मचारीही ठेवले आहेत. दान आलेल्या पैशातूनच त्यांना पगार दिला जातो. दान आलेली कॅश मोजण्यासाठीही इथे कर्मचारी आहे.
9 / 9
कर्नाटकचे पर्यटन मंत्री राहिलेले जनार्दन रेड्डी यांनी मंदिरात हिऱे जडलेला १६ कोटीचा सोन्याचा मुकूट चढवला होता. याची किंमत ४५ कोटी रूपये इतकी होती.
टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटGoldसोनंcorona virusकोरोना वायरस बातम्या