शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

चायनीज कपलला झाली रशियनसारखी दिसणारी मुलगी, डीएनए टेस्टने समोर आणलं हैराण करणारं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:39 IST

1 / 6
कधी-कधी आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घडतात ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो. म्हणजे एका क्षणाला आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीचा आनंद झालेला असतो, तर पुढच्याच क्षणाला तो आनंद नाहीसा होतो. असंच काहीसं चीनमधील एका परिवारासोबत झालं. या परिवारात एका मुलीचा जन्म झाला, पण तिला बघताच सगळे हैराण झाले. (Image Credit : instagram/dommystories)
2 / 6
हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, कुणाच्याही परिवारात बाळाचा जन्म झाल्यावर आणि त्याचा चेहरा पाहिल्यावर सगळ्यांना आनंद होतो. आई-वडिलांचा आनंद तर गगनात मावेनासा असतो. चीनमधील या कपलला सुद्धा मुलगी झाल्याचा आनंद झाला. पण तिचा चेहरा पाहताच त्यांना प्रश्नही पडला. कारण या चीनी कपलच्या मुलीचे केस सोनेरी होते आणि तिचे डोळेही निळ्या रंगाचे होते. म्हणजे ती परिवारातील कुणासारखीही दिसत नव्हती. आई-वडील चीनीच होते, त्यामुळे मुलीचं हे रूप त्यांना बुचकळ्यात टाकणारंच होतं.
3 / 6
चीनच्या जियांगसू प्रांतातील ही घटना आहे. इथे मुलीच्या जन्मानंतर कुटुंबियांना वेगवेगळे प्रश्न पडले. मुलीची गोरी त्वचा, सोनेरी केस आणि निळे डोळे यूरोपियन लोकांसारखे होते. संशय इतका वाढला की, कुटुंबियांना वाटलं की, दवाखान्यात मुलीची अदला-बदली तर केली नसेल ना. हा संशय दूर करण्यासाठी त्यांनी अनेकदा डीएनए टेस्टही केली. प्रत्येकवेळी हेच समोर आलं की, मुलगी त्यांचीच आहे.
4 / 6
आता डीएनए टेस्टही बरोबर आल्यावर असा प्रश्न होता की, मुलगी इतकी वेगळी का दिसते आहे? याचाच पत्ता लावण्यासाठी कुटुंबियांनी परिवाराचा इतिहास शोधण्यास सुरूवात केली. जुनी कागदपत्रे चेक केली आणि वृ्द्धांनाही विचारलं. तेव्हा जे समोर आलं त्यातून सगळं स्पष्ट झालं. मुळात मुलीच्या वडिलांचे पणजोबा रशियन वंशाचे होते, ते नंतर चीनमध्ये जाऊन स्थायिक झाले. तिथे त्यांनी एका स्थानिक महिलेशी लग्न केलं होतं. काळानुसार ही परदेशी ओळख परिवारात कुठेतरी दडून बसली होती.
5 / 6
कुटुंबाची हीच लपून बसलेली ओळख अचानकपणे पुढच्या पिढीत समोर आली. विज्ञानाच्या भाषेत याला 'रिसेसिव्ह जीन' म्हटलं जातं. असे जीन जे अनेक पिढ्या दबून राहतात आणि कधीतरी अचानक प्रकट होतात. याच कारणे मुलगी यूरोपिअन दिसत आहे. एक्सपर्टनुसार, ही घटना भलेही दुर्मीळ असेल, पण अशक्य अजिबात नाही. सोनेरी केस आणि निळ्या डोळ्यांचे गुण अनेकदा लपून राहतात, खासकरून आशियाई परिवारात. जर वंशात परदेशी जीन असतील तर ते अनेक वर्षांनी सुद्धा समोर येऊ शकतात.
6 / 6
काळानुसार मुलीची खासियत समोर येत आहे. आता परिवाराने ही अनोखी विरासत गर्वाने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर सुद्धा ही कहाणी वेगाने पसरली आहे. लोक याला निसर्गाचा चमत्कार आणि जेनेटिक्सची कमाल म्हणत आहेत.
टॅग्स :chinaचीनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके