बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:05 PM2021-04-03T16:05:44+5:302021-04-03T16:15:12+5:30

दोघांनी विचार केला की, त्यांना फार काही अडचण येणार नाही आणि ते शरीरसंबंध ठेवण्याचा विचार करू लागले. हवेत संबंध ठेवणं अडचणीचं ठरू शकतं का?

पॅराशूट घालून वेगवेगळे कर्तब दाखवण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. पण एक अशी हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका कपलने आकाशातच उडत असताना शरीरसंबंध ठेवला. पण हा कारनामा त्यांना चांगलाच महागात पडला आहे. कारण दोघेही हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.

द सन डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, हे सगळं दोघेही स्काय डायविंग करत असताना झालं. कपलने स्वत: खुलासा केला की, जेव्हा त्यांचा पॅराशूट उघडला नाही तेव्हा त्यांच्यासोबत काय झालं आणि शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील टीएलसीच्या एका टॉक शोमध्ये बोलताना विलियम आणि लेस्लीने ही संपूर्ण घटना सांगितली. ते म्हणाले की, ते एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सोबत आहे. आम्ही फार जास्त रिस्क असलेल्या या गेममध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला.

विलियमने सांगितले की, त्याचं लेस्लीवर प्रेम आहे आणि तिचं माझ्यावर. दोघांनी या स्कायडाइवमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. विमानात त्यांनी एकमेकांना किस केलं आणि पॅराशूटसोबत दोघांनी बाहेर उडी घेतली.

यानंतर दोघांनी विचार केला की, त्यांना फार काही अडचण येणार नाही आणि ते शरीरसंबंध ठेवण्याचा विचार करू लागले. हवेत संबंध ठेवणं अडचणीचं ठरू शकतं का? पण लेस्लीला विश्वास होता की, त्यांना यात काहीच अडचण येणार नाही.

लेस्लीने सांगितले की, आम्ही बॅगी शॉर्ट्स घातले होते. त्यामुळे मला वाटत होतं की, जे व्हायचं ते सहजपणे होईल. ते म्हणाले की, आम्ही एक लेव्हलपर्यंत ठीक होतो. पण थोड्याच वेळात आम्ही चुकीचे ठरलो आणि आमच्या प्रेमाने चुकीचा टर्न घेतला.

आता जमीन जवळच असल्याने विलियमने पॅराशूट उघडलं. पण पॅराशूट पूर्ण उघडलं नाही. ते दोघेही जमिनीवर जोरात पडले. लेस्लीने तो क्षण आठवत सांगितले की, जेव्हा मी त्याला जमिनीवर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की, तो मरण पावला.

विलियमला यात जास्त मार लागला. त्याच्या नाकाला मार लागला, कंबरेला मार लागला. कसंतरी दोघांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरानी सांगितले की, केवळ विलियमची नाकाची जखम गंभीर आहे. बाकी ठीक आहे.

दोघेही आता बरे होत आहेत. त्यांना काही दिवस आराम करावा लागला. या टॉक शोमध्ये बोलताना विलियम आणि लेस्लीने पूर्ण किस्सा सांगितला की, कशाप्रकारे जखमी झाल्यावर त्यांनी दिवस काढले.

Read in English