coronavirus : ना लॉकडाउन ना कर्फ्यू, तरी 'या' देशाने कोरोनाला दिली मात, पण कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:40 PM2020-03-26T14:40:16+5:302020-03-26T15:07:34+5:30

कोरोनाला मात देण्यासाठी या देशातील लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी केलेल्या गोष्टी आता जगभरातील देशांसाठी मॉडल मानलं जात आहे.

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळ आज महामारीचं रूप घेतलं आहे. जगभरातील हजारो लोकांचा जीव गेला आहे. असं असलं तरी चीनचा शेजारी देश जो वुहानपासून केवळ 1382 किलोमीटर अंतरावर आहे. त्याने कोरोनाला जवळपास मात दिली आहे.

कोरोनाला मात देण्यासाठी या देशातील लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी केलेल्या गोष्टी आता जगभरातील देशांसाठी मॉडल मानलं जात आहे. इथे कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नसला तरी त्याला रोखण्यात मोठं यश आलं आहे.

आम्ही ज्या देशाबाबत सांगत आहोत तो देश आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाजवळ अमेरिका, इटली आणि स्पेनसारखी मजबूत आरोग्य व्यवस्था नसूनही या देशात कोणतीही बंदी करण्यात आली नाही. म्हणजे इथे ना लॉकडाउन केलं गेलं ना कर्फ्यू लावण्यात आला.

कोरोनाने संक्रमित देशांच्या यादीत आज दक्षिण कोरिया 8व्या स्थानावर आहे. आतापर्यंत या देशात कोरोनाची लागण झाल्याच्या 9137 केसेस समोर आल्या आहेत. ज्यात 3500 पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर या व्हायरसने येथील 129 लोकांचा जीव घेतल. तर 59 लोकांची स्थिती गंभीर आहे.

कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी दक्षिण कोरिया एक उदाहरण ठरला आहे. पण आधी अशी स्थिती नव्हती. दक्षिण कोरियात 8 ते 9 मार्च दरम्यान 8 हजार लोक कोरोनाने संक्रमित होते. मात्र, गेल्या काही दिवसात केवळ 12 केसेस समोर आल्या आहेत. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे या देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यापासून आजपर्यंत कोणतंही लॉकडाउन केलं नाही.

दक्षिण कोरियाकडून आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने दुसऱ्या देशांना शिकण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी य देशाने आधीच तयारी केली होती.

देशातील सरकारने सरकारी अधिकाऱ्यांसहीत मेडिकल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत भेटी घेऊन त्यांना टेस्ट किट तयार करण्याचे सांगितले होते. योग्य उपचारासाठी या देशाने वेळीच कोरोना व्हायरसची तपासणी सुरू केली, ज्यासाठी देशभरात 600 पेक्षा जास्त टेस्ट सेंटर सुरू केले.

कोरोना व्हायरसच्या स्क्रीनिंगसाठी या देशाने मोठ्या इमारती, हॉटेल्स, पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणांवर थर्मल इमेजिंग कॅमेरे लावले होते. ज्यांद्वारे आजारी किंवा ताप असलेल्या व्यक्तीची लगेच ओळख पडत होती.

रेस्टॉरन्ट आणि हॉटेल्समध्ये तपासणी केल्यावरच प्रवेश मिळत होता. त्यासोबत येथील तज्ज्ञांनी हातांना संक्रमण होणं टाळण्यासाठी एक भन्नाट आयडिया केली.

जी व्यक्ती उजव्या हाताने काम करते त्या व्यक्तीला दरवाज्याचं हॅन्डल, मोबाइल चालवण्यासहीत प्रत्येक छोटं काम करण्यासाठी डाव्या हाताचा वापर करण्याचा सल्ला दिली.

त्याचप्रमाणे जी व्यक्ती डाव्या हाताने काम करते त्यांना उजव्या हाताचा वापर करण्याचा सल्ला दिला. शरीरात व्हायरसचा प्रवेश हातांद्वारेच होतो. अशात याचा चांगला फायदा झाला.