कंडोमचा उपयोग 'या' कामासाठीही केला जाऊ शकतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:22 IST2020-01-08T18:20:35+5:302020-01-08T21:22:07+5:30

कंडोमचा वापर शारीरिक संबंधावेळी केला जातो. मात्र शारिरीक संबंधव्यतिरिक्त कंडोमचा विविध कामांसाठी देखील वापर केला जाऊ शकतो.
बुटांना चमकवण्यासाठी देखील कंडोमचा वापर केला जाऊ शकतो.
कंडोम वॉटर- प्रुफ असल्यामुळे पावसात मोबाइलला पाण्यापासून सुरक्षित ठेवायचे असल्यास कंडोमध्ये मोबाइल टाकून खराब होण्यापासून वाचवू शकतो.
शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी देखील कंडोमचा वापर केला जाऊ शकतो. 1991मध्ये आखाती युद्धाच्यादरम्यान ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाकडून शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी व खराब होऊ नये यासाठी सुमारे 5 लाख कंडोम सैनिकांना पाठवण्यात आले होते.
कंडोम वॉटर-प्रुफ आणि लवचिक असल्याने त्याचा उपयोग पाण्याखालील रेकॉर्डिंगसाठी देखील वापरण्यात आले आहेत.
जर हातावर किंवा पायाला जखम झाली असेल आणि काम करण्यास किंवा आंघोळ करण्यास त्रास होत असेल तर झालेल्या जखमेवर कंडोम घालू शकतो. जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होणार नाही.