जगापासून लपवून कोरोना फ्री शहर बनवत आहे चीन, अखेर सीक्रेट फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 03:05 PM2020-09-11T15:05:31+5:302020-09-11T15:26:08+5:30

चीन जगापासून लपवून हे शहर बनवण्याचा प्रयत्न करत होता. पण हे लपू शकलं नाही. अनेक प्रयत्न करूनही या शहराचे फोटो समोर आलेत. (All Image Credit : DailyMail)

जगातील जास्तीत जास्त देश सध्या कोरोनासोबत लढत आहेत. सगळेजण कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरत आहे. पण चीन हा आरोप फेटाळून लावलाय. काही लोकांचं मत आहे की, व्हायरस चीनच्या मीट मार्केटमधून पसरला तर काही लोक म्हणतात वुहानमधील लॅबमधून व्हायरस पसरला. अशात आता चीन एक नवं शहर बनवत आहे. चीन जगापासून लपवून हे शहर बनवण्याचा प्रयत्न करत होता. पण हे लपू शकलं नाही. अनेक प्रयत्न करूनही या शहराचे फोटो समोर आलेत. या शहरात वेगवेगळ्या सुविधा आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे शहर कोरोना फ्री आहे. हे शहर कोविड फ्री होण्याच्या हिशेबाने तयार केलं आहे.

सोशल मीडियावर गुप्तपणे तयार करण्यात येणाऱ्या सीक्रेट शहराचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे शहर चीनच्या लोकांसाठी कोरोनापेक्षाही मोठ्या महामारीपासून बचावासाठी सुरक्षित असेल.

हे शहर चीन फारच गुपितपणे बनवत आहे. हे बीजिंगच्या क्सिओंग न्यू एरियात तयार केलं जातंय. यात सर्वच सुविधा असणार आहेत.

या शहरात महामारी दरम्यान चीनच्या लोकांना आरामात राहण्यासाठी सर्व सुविधा असतील. जेणेकरून पुढे जर अशी महामारी आली तर लोकांची गैरसोय होऊ नये.

या शहरात लाकडाच्या बॉक्सपासून तयार केलेली घरे असतील. तसेच छतांवर शेतीही केली जाऊ शकेल.

तसेच या शहरावर ड्रोनने नजर ठेवली जाईल. जर शहरात काही समस्या असेल तर लगेच त्याची माहिती मिळेल.

जगभरातील देशात लॉकडाऊन सुरू असताना चीन हे शहर उभारत होता. हैराण करणारी बाब म्हणजे स्पेनच्या एका आर्किटेक्टने टेंडरही लॉकडाऊनमध्ये घेतलं.

ज्या शहराचे फोटो समोर आलेत ते लंडन आणि न्यूयॉर्कपेक्षाही मोठं आहे. ७७२ स्क्वेअर मैलमध्ये तयार हे शहर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.