तुम्ही तरंगत गावं पाहिलंय का? 'या' ठिकाणी आहे हे समुद्रात तरंगणार गाव, कारण वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:26 IST
1 / 11जगात असे एक गाव आहे जे समुद्रामध्ये तरंगत आहे. आज आम्ही तुम्हाला या विचित्र गावाविषयी सांगणार आहोत. 2 / 11हे गाव आपण चीनमध्ये आहे. हे गाव पाण्यावर तरंगत आहे. चीनच्या निंगडे शहरात हे गाव आहे.3 / 11या गावाच सुमारे ७ हजार मच्छिमार राहतात. त्यांच्या प्रजातीला टंका या नावाने ओळखले जाते. टंकांना ‘जिप्सी ऑन द सी’ म्हणून देखील ओळखले जाते.4 / 11 सागरी मच्छिमारांचे गाव दक्षिणपूर्व चीनमधील फुजियान प्रांतातील निंग्डे (Ningde) शहराजवळ आहे.5 / 11चीनचे हे गाव १३०० वर्ष जुने आहे आणि या गावात सुमारे ८ हजार ५०० लोक राहतात.6 / 11टंका लोकांचे जीवन हे मासेमारीवर आवलंबून असल्यामुळे पाण्यातच तरंगणारे घरे तयार केली आहेत. यात त्यांनी लाकडांचे मोठे प्लॅटफॉर्मही बनवले आहेत. त्यांच्या प्रत्येत पीढीला ही कला शिकवली जाते.7 / 11या गावाची कथा मोठी रंजक आहे. शेकडो वर्षांपूर्वी टांका समुद्रातील लोक तिथल्या शासकांकडून होणार्या शोषणामुळे एवढे नाराज झाले होते की, त्यांनी समुद्रावरच राहण्याचा निर्णय घेतला.8 / 11चीनमध्ये इ. स. ७00मध्ये तांग राजांची सत्ता होती. त्या काळी टांका समुदायाचाचे लोक युद्धापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी होड्यांमध्ये राहू लागले. तेव्हापासून त्यांना ‘जिप्सीज ऑन द सी’ असे म्हटले जाऊ लागले. 9 / 11हे लोक क्वचितच जमिनीवर येतात.आताही ते ना जमिनीवर येण्यास तयार आहेत, ना आधुनिक जीवनशैली स्वीकारण्यास.10 / 11जमिनीवर जाण्याची गरज भासू नये यासाठी त्यांनी तरंगती घरेच नाही तर लाकडांच्या मदतीने छोटी छोटी तरंगती शेतेही बनवून घेतली आहेत. त्यात ते अन्नधान्य व अन्य भाजीपाला पिकवतात.11 / 11चीन सरकार 'टंका' जमातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या गावक-यांना पाण्यात राहण्यात आनंद वाटतो.