चांगभलं! मुलाच्या चुकीनं वडिलांना बनवलं कोट्यधीश; तब्बल ७.५ कोटींचा जॅकपॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 20:54 IST2022-01-29T20:51:03+5:302022-01-29T20:54:24+5:30

सोशल मीडियावर नेहमी अजब-गजब किस्से आणि व्हिडीओ व्हायरल होतात. अलीकडेच एका २ वर्षाच्या बाळाने आईचा मोबाईल हातात घेऊन त्यावरुन तब्बल दीड लाखांचे फर्निचर ऑर्डर केल्याचं ऐकायला मिळालं. ही बातमी सोशल मीडियात गाजली.

मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानं कधी काय होईल सांगता येत नाही. तसेच कुणाचं नशीब कधी चमकेल. कधी लक्ष्मी दारात येईल काहीही सांगू शकत नाही. काही लोकांबद्दल म्हणलं जातं की, त्यांचं नशीब हे सुवर्ण अक्षरानं लिहिलेलं असतं. मग त्यांच्या नशीबात काही असो वा नसो, पैसे खूप असतात.

असेच एक प्रकरण समोर आलं आहे की, अमेरिकेच्या मेरिलँड येथून. याठिकाणी एका व्यक्तीच्या मुलाकडून नकळत चूक घडली परंतु त्याचा फायदा त्या व्यक्तीलाच झाला. या व्यक्तीला जवळपास ७ कोटींचा जॅकपॉट लागला आणि त्याचे नशील क्षणात बदलले.

५१ वर्षाच्या प्रिंस जॉर्जला ही लॉटरी लागली आहे. प्रिंस जॉर्जनं सांगितले की, एकेदिवशी मी माझ्या मुलाला आणण्यासाठी त्याच्या शाळेत गेलो होतो. तेव्हा कारच्या दरवाज्यात चुकून मुलाचं जॅकेट अडकल्याचं कळालं आणि जमिनीवर पडल्याने ते खराब झाले.

मुलाचं जॅकेट स्वच्छ करण्यासाठी प्रिंस जॉर्ज ड्राय क्लीनरकडे दुकानात पोहचले. जेव्हा जॉर्ज जॅकेट साफ करण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे असणारा टीव्ही पाहून त्यांच्या लक्षात आलं की, त्यांनी २ डॉलरचं लॉटरी तिकीट खरेदी केले होते.

जवळपास १ आठवडा झाला ते तिकीट घरीच पडून होतं. मात्र जॅकेट साफ करताना टीव्हीवरील जाहिरात पाहून त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यानंतर घरी जाऊन तिकीट शोधलं. तिकीट मिळाल्यानंतर त्याचा नंबर मोबाईलवर चेक केला.

तेव्हा जॉर्ज यांना कळालं की, त्यांना १ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास साडे सात कोटींची लॉटरी लागली आहे. ही लॉटरी जिंकल्यानंतर जॉर्जने सांगितले की, ही बातमी कळताच मला शॉक बसला. काही क्षणात माझं संपूर्ण आयुष्यचं बदलल्याचं प्रिंसनं सांगितले.

लॉटरीत जिंकलेल्या पैशाचं काय करणार असं विचारल्यावर जॉर्जनं सांगितले की, या रक्कमेतून मुलांच्या कॉलेजची फीस, सर्व कर्ज फेडून टाकणार आहेत. त्याचसोबत कुटुंबातील अन्य सदस्यांचीही मदत करत असून पुढील काळात जगभ्रमंती करण्यासाठी जाणार आहे.

















