कंबरदुखीची समस्या घेऊन डॉक्टरकडे गेला, सीटी स्कॅनमधे जे दिसलं ते पाहून डॉक्टर चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:01 PM2020-05-08T14:01:28+5:302020-05-08T14:18:24+5:30

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही 38 वर्षीय व्यक्ती कंबरदुखीच्या समस्या घेऊन डॉक्टरकडे गेली. काही दिवसांपासून त्याचा त्रास वाढला होता.

अनेकदा आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात की, आपल्यालाच त्यावर विश्वास बसत नाही. कधी कधी तर असं काही होईल याचा विचारच काय कल्पना देखील केलेली नसते.

अशीच एक आश्चर्यकारक घटना एका व्यक्तीसोबत घडली. या व्यक्तीला लोअर बॅक पेन म्हणजेच कंबरदुखीची समस्या होती.

सामान्यपणे बसून काम करणाऱ्यांना ही समस्या होतेच. ब्राझील साओ पाउलोमधील ही व्यक्ती कंबरदुखीची समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरकडे गेली.

मात्र, डॉक्टरांनी जेव्हा त्याचा सीटी स्कॅन काढला तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून तेही थक्क झाले.

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही 38 वर्षीय व्यक्ती कंबदुखीच्या समस्या घेऊन डॉक्टरकडे गेली. काही दिवसांपासून त्याचा त्रास वाढला होता. त्याने सीटी स्कॅन केलं. (सांकेतिक छायाचित्र)

स्लिप डिस्कची तर समस्या नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने सीटी स्कॅन केलं. यात स्लिप डिस्क तर नाही पण चक्क व्यक्तीला तीन किडनी असल्याचं दिसून आलं. हा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले.

सीटी स्कॅनने डॉक्टरांना चक्रावून सोडलं होतं. कारण त्यांनी अशी केस कधी पाहिली नव्हती. त्यांना दिसलं की, व्यक्तीच्या उजव्या बाजूला दोन किडनी आहेत. तर डाव्या बाजूला एक किडनी. म्हणजे या व्यक्तीला एकूण तीन किडनी आहेत.

सामान्यपणे अशी केस तेव्हा समोर येते जेव्हा एखादा अपघात होतो किंवा डायग्नोसिसच्या माध्यमातून हे समोर येतं.

सध्या या व्यक्तीला लोअर बॅक पेनचं औषध देण्यात आलं आहे. मात्र, तीन किडनी असणं ही एक फार दुर्मीळ गोष्ट आहे.