सुंदर अशी फोटोग्राफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 04:13 PM2020-03-09T16:13:07+5:302020-03-09T22:45:12+5:30

जगातील सर्वात प्रतिष्ठित सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्डचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधील काही फोटोस् आम्ही आपल्या समोर आणत आहेत. ज्यामध्ये फोटोग्राफर्संनी निसर्ग सौंदर्याचे विविध रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

हा कुकाबुरा पक्षी आहे. जो संध्याकाळी ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आग पाहत आहे. हा फोटो अॅडम स्टिव्हेंसन यांनी आपल्या आयफोन टेनमधून टिपला आहे.

स्लोव्हेनियाचे फोटोग्राफर एल्स क्रिवेक यांनी हा फोटो काढला आहे.

हा फोटो सुंदर आहे. यामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा दिसत आहे. हा फोटो हाँगकाँगचे फोटोग्राफर हाँग चँग ने यांनी टिपला आहे.

इंडोनेशियाच्या जंगलात बसलेला हा माकड आजूबाजूचा परिसर न्याहळत आहे. हा फोटो जान सिमोन यांनी काढला आहे.

हा फोटो एस्टोनियामधील आहे. याठिकाणी कुत्रा त्याच्या मालकाने केलेल्या एका शिकारसह उभा आहे. फोटोग्राफर क्रिस्टिना टेमिक यांनी हा फोटो काढला आहे.

रात्रीच्या अंधारात Beaver प्राणी शिकारीच्या शोधात असताना फोटो टिपला आहे. या फोटो श्रीलंकेच्या लक्षिता करुणारत्नाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

या फोटोत तुम्ही पाहू शकता की, जिराफला पाणी पिण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. हा फोटो नामिबियातील ओंगुमा सफारी पार्क येथे स्वीडनचे फोटोग्राफर मार्कस वेस्टबर्ग यांनी टिपला आहे.

या फोटोत एक जंगली सांड झुडुपातून डोके वर काढून पाहत असल्याचे दिसत आहे. हा फोटो दक्षिण आफ्रिकेचा फोटोग्राफर विल वेंटर यांनी काढला आहे.

या फोटो seal ला शिकार करताना पाहू शकता. हा फोटो तैवानचे फोटोग्राफर युंग-सेन व्हू यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

नेपाळचे फोटोग्राफर कुशल शाही यांनी पर्वतांचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे.