मामी पडली भाच्याच्या प्रेमात... त्याच्या बाळाला जन्मही दिला, पण पुढे घडलं ते धक्कादायक होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:20 PM2020-05-18T15:20:42+5:302020-05-18T16:05:48+5:30

मामीला जशी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती मिळाली तिने असं पाउल उचललं की, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

लॉकडाऊनमुळे एकापेक्षा विचित्र आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या कित्येक घटना दररोज समोर येत आहेत. अशीच एक आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून समोर आली आहे. (सांकेतिक छायाचित्र) (Image Credit : AmarUjala)

येथील एक अजब प्रेम कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एक भाचा त्याच्या मामीच्या प्रेमात पडला अन् त्यांची प्रेम कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली मामी बाळासोबत त्याच्या घरी राहण्यासाठी गेली होती. अशात मामी अचानक गायब झाल्याची तक्रार कुटूंबियांनी पोलिसात दिली. (सांकेतिक छायाचित्र)

मामीला जशी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती मिळाली तिने असं पाउल उचललं की, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. (सांकेतिक छायाचित्र)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भिंड जिल्ह्यातील चरथर गावात राहणाऱ्या तरूणाचं ग्वालिअरच्या बिरलानगरमध्ये राहणाऱ्या मामाच्या घरी येणंजाणं होतं. दरम्यान त्याचं मामीसोबत अफेअर सुरू झालं. (सांकेतिक छायाचित्र)

मामीसोबत तब्बल 6 वर्षापासून भाच्याचं अफेअर सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इतकेच काय तर दोघांमध्ये शारीरिक संबंधही होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षात मामी आणि भाच्याने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. दोघांच्या प्रेमाची निशाणी असलेल्या एका बाळाला मामीने जन्मही दिला. (सांकेतिक छायाचित्र)

जशीही या गोष्टीची माहिती मामाला मिळाली त्याने पत्नीला मारझोड केली. पण तरी सुद्धा मामी-भाच्याचे प्रेम संबंध काही संपले नाहीत. दोघांमध्ये भींत उभी केल्यावर तर दोघांचं प्रेम अधिकच वाढलं. (सांकेतिक छायाचित्र)

घरातील लोकांच्या अत्याचाराला कंटाळून मामी 13 मे रोजी घरातून पसार झाली. ग्वालिअर सोडून ती भिंड येथील भाच्याच्या घरी पोहोचली. पण भाचा मामीला घेऊन स्वत:च्या घरात नाही तर बरूआ नगर परिसरात भाड्याच्या घरात राहू लागला. (सांकेतिक छायाचित्र)

रविवारी भाचा सिलेंडर भरण्यासाठी बाजारात गेला होता. कुटूंबियांनी तेव्हा त्याला पाहिलं. नंतर त्याचा पाठलाग केला. कुटूंबियांनी तरूणाची माहिती पोलिसांना दिली.

मामीला वाटलं की, आता पोलीस आल्यानंतर ती भाच्यापासून दूर होईल. या भीतीने तिने चाकूने स्वत:चा गळा कापला. प्रेयसीने असं केल्यावर प्रियकराने देखील हाताची नट कापून घेतली.

कुटूंबियांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथे मामीची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read in English