आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने असं सजवा घर By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:30 PM
1 / 8 घर सुंदर दिसावं यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. आकर्षक आणि हटके पद्धतीने घर सजवण्याकडे अधिक कल असतो. आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने घर सुंदररित्या सजवता येतं. 2 / 8 सध्या आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या सजावटीचा ट्रेंड आहे. खोट्या फुलांचे दोन फायदे आहे. एक तर ही फुलं कोमेजून जात नाही आणि दुसरं म्हणजे वेळोवेळी ती स्वच्छ करता येतात. 3 / 8 बाजारात विविध रंगाची, आकाराची सुंदर फुलं उपलब्ध असतात. त्यामुळे घरातील रंगसंगतीप्रमाणे तसेच इंटिरिअरप्रमाणे हवी तशी फुलं निवडता येतात. 4 / 8 आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने हटके पद्धतीने घर सजवता येतं. 5 / 8 घराच्या बाल्कनीमध्ये अशा पद्धतीने फुलांचं डेकोरेशन करता येतं. 6 / 8 घराच्या भिंतींवर हँगिंग बास्केटच्या मदतीने सजावट करा. 7 / 8 घरामध्ये अथवा खिडकीजवळ सजावटीसाठी फ्लॉवर शो-पीसची मदत घेता येईल. 8 / 8 गार्डन एरियाला आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने सुंदर लूक देता येतो. आणखी वाचा