नव्वदीतल्या या आजींचा उत्साह तरुणांनाही लाजवेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 02:44 PM2018-08-27T14:44:35+5:302018-08-27T15:08:32+5:30

वय हा फक्त आकडा आहे, असं म्हणतात. आयुष्य आपल्यापासून बालपण हिरावून घेऊ शकतं. मात्र एखाद्या व्यक्तीनं मनात बालपण जपलं असेल, तर त्याचं बालपण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

आयुष्य मजेत जगणाऱ्यांपैकी एक म्हणजे जपानमधील या आजी. 90 वर्षांच्या किमिको निशिमोटो सध्या आयुष्याची सेकंड इनिंग एन्जॉय करत आहेत.

शरीरानं थकल्या असल्या तरी किमिको मनानं अतिशय तरुण आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या अगदी समरसून जगत आहेत.

इतर वृद्धांसारखं आला दिवस ढकलून जगणं किमिको यांना मान्य नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस त्या आनंदानं जगतात.

सध्या किमिको यांच्या विविध वेशभूषेतील कपड्यांमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

विशेष म्हणजे टोकियोमध्ये या फोटोंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. आयुष्याचा उत्तरार्धही अतिशय मनमोकळेपणानं जगणाऱ्या किमिको यांचे फोटो पाहायला लोकांना मोठी गर्दी केली होती.

किमिको यांचे फोटो अनेकार्थांनी लक्षवेधी आहेत. त्यांच्या या फोटोंमुळे अनेकांना जगण्याची नवी उमेद आणि उर्जा दिली आहे.