'किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है..... ' राहत इंदौरी यांच्या आयुष्याबद्दल ८ गोष्टी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:01 PM2020-08-11T20:01:42+5:302020-08-11T20:12:59+5:30

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानं त्यांचे निधन झालं आहे. त्यांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं त्यामुळे उपचारासाठी त्यांना मध्यप्रदेशातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्टला रात्री उशिरा त्यांना ऑरबिंदो रुग्णालयात उपचारासाठी हलवल होतं. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी ही माहिती दिली होती. राहत इंदोरी यांच्या आयुष्याबाबत काही खास गोष्टी आम्ही तुम्हला सांगणार आहोत.

राहत इंदौरी यांचा जन्म १ जानेवारी १९५० मध्ये इंदूरला झाला. रफ्तुल्लाह कुरैशी आणि मकबूल उन निशा बेगम यांच्या घरी राहत यांचा जन्म झाला. त्याचे संपूर्ण शिक्षण इंदूरमध्येच झाले. १९७५ मध्ये त्यांनी बरकतउल्लाह विद्यापीठ भोपाळ येथून एमएचं शिक्षणं घेतलं.

एवढ्यावरचं त्यांच शिक्षणं थांबलं नाही. तर त्यांनी १९८५ मध्ये मध्यप्रदेशातील स्लामिया करीमिया कॉलेजमधून पीचडीची पदवी घेतली.

यांनी आपल्या करीअरची सुरूवात इंद्रकुमार कॉलेजमध्ये उर्दू साहित्य शिक्षकवण्यापासून केली. कमी कालावधीत ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना सुरूवातीला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

भारतातच नाही तर परदेशातूनही त्यांना शायरांकडून आमंत्रण मिळत होते. आपली शब्दसंपदा आणि अफलातून शायरी यांमुळे त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. उर्दू साहित्य म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

विशेष म्हणजे फक्त शायरी आणि अभ्यास नाही तर इतर गोष्टींमध्येही त्यांना रस होता. शाळेत आणि महाविद्यालयात हॉकी आणि फुटबॉलच्या संघाचे कर्णधार पद त्यांच्याकडे होतं.

त्यांना दोन मोठ्या बहिणी होत्या. तहजीब आणि तकरीब अशी त्यांची नाव होती. अकिल आणि आदील असे दोन भाऊ होते.

कुटुंबाची आर्थिक स्थिती प्रतिकुल असल्यामुळे त्यांनी साईन चित्रकाराचं काम केले. त्यांना चित्रकलेची खूप आवड होती.